30.9 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home गुन्हेवार्ता सुगंधित तंबाखूची आंतरराज्यीय तस्करी

सुगंधित तंबाखूची आंतरराज्यीय तस्करी

0
21

तुमसर,दि.17ः-महाराष्ट्रात बंदी असलेल्या सुगंधित तंबाखूची तस्करी मध्यप्रदेशातून केली जाते. अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू आहे. या सुगंधीत तंबाखूची ट्रकच्या सहाय्याने तस्करी होत असताना तुमसर तालुक्यातील डोंगरला येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ट्रकला पकडले. त्यात ४ लाख ७५ हजारांची सुगंधित तंबाखू आढळून आली. ही कारवाई बुधवारी करण्यात आली.
मध्यप्रदेशातील बालाघाट येथून नागपूरच्या दिशेने जाणारा ट्रक क्र मांक एमपीएच 0८४0 मध्ये सुगंधीत तंबाखूची वाहतूक केली जात होती. डोंगरला येथे या ट्रकला थांबविण्यात आले. चालक व वाहकास भंडारा येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रवींद्र मानकर यांनी विचारणा केली. आधी त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांच्यावर संशय बळावल्याने ट्रकची तपासणी करण्यात आली. त्यात सुगंधीत तंबाखूचा साठा आढळून आला. ही तंबाखू १ हजार १८८ किलो वजनाची असून त्याची किंमत ४ लाख ७५ हजार रुपये इतकी आहे.
पोलिसांनी ही माहिती भंडारा येथील अन्नपुरवठा विभागाला दिली. अन्नपुरवठा विभागाचे सहाय्यक आयुक्त नारायण सरकटे, अन्नसुरक्षा अधिकारी नंदनवार, नमूना सहाय्यक निलकंठ बारसागडे हे तुमसर पोलिस ठाण्यात दाखल झाले. या पथकाने अन्नपुरवठा नियमानुसार अन्नपुरवठा मानद कायद्यानुसार कारवाई करुन तंबाखूचे नमून नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविले.पोलिसांनी याप्रकरणी भादंविच्या कलम २६२, २६३, १८८ अन्वये गुन्हा दाखल केला. तपास सुरू आहे.