26.1 C
Gondiā
Saturday, August 1, 2026
Home गुन्हेवार्ता सोनेगावातील साईनाथ हाॅटेलमधून 11 हजाराची दारु जप्त

सोनेगावातील साईनाथ हाॅटेलमधून 11 हजाराची दारु जप्त

0
42

नागपूर,दि.31ः- जिल्ह्यातून जाणार्या नागपूर-चंद्रपूर राष्ट्रीय महामार्गावरील सोनेगाव(लोधी)येथील साईनाथ हाॅटेलमध्ये छापा घालून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने सुमारे 11 हजार रुपये किमतीची देशी विदेशी दारु जप्त केली.राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक प्रमोद सोनोने यांच्या मार्गदर्शनात उपनिरिक्षक वरठी ,शिपाई राठोड व भोयर यांनी ही कारवाई केली.कारवाई दरम्यान हाॅटेल मालक विकास शाहू यांना अटक करण्यात आली असून आमगाव (देवळी) ता.हिंगणा येथील रहिवासी  उमेश मासारकर व तुळशीराम डडमल यांनाही त्यांच्या राहत्या घरी देशी दारू विक्री करीत असताना आढळून आल्याने दारूबंदी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.