लाकडी दांड्याने मारुन खून

0
19

संख,दि.05ः- उमदी पोलीस ठाणेंतर्गत येत असलेल्या जलिहाळ(बु.)येथे आपसी भांडणातील वादात आरोपीने लाकडी दांड्याने मारुन खून केल्याची घटना 4 फेबुवारीच्या रात्री साडेदहा च्या सुमारास घडली.मृतकाचे हणमंत शंकर माने असे नाव आहे.मृतकासोबत संशयीत आरोपी आमगोंडा कोडगानूर यांच्यात झालेला वाद पांडू भोसले,सिध्दू भोसले,सिध्दू बिराजदार व मलकू पुजारी हे सोडवित असतानाच कोडगानूर याने लाकडी दांड्याने मृतकाच्या डोक्यावर मारहाण केली.यात त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.याप्रकरणाची तक्रार हणंमत माने यांचा भाऊ रमेश महादेव माने यांनी उमदी पोलीस ठाण्यात नोंदविली.तक्रार मिळताच सपोनि भगवान शिंदे यांनी घटनास्थळ गाठून सशंयतीला ताब्यात घेतले.तपास कार्यात ,पोलीस उपनिरीक्षक श्री संपागे ,पो का कुंभारे ,पोलीस हवालदार दिघे, पो का भिसे,पो ना सचिन आटपाडकर,श्रीशैल वळसंग, पो का चौगुले, यांनी सहकार्य केले असून उपविभागीय पोलीस अधिकारी अनिकेत भारती यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली.