शासनाकडून मिळणाऱ्या बोअरवेल व विहिरीचा फायदा घ्या : पुराम

0
21

देवरी,दि.05 : जो शेतकरी खऱ्या अर्थाने शेती करतो व शेतीतून जास्त उत्पन्न काढण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु वरच्या पावसावर अडून असतात. म्हणून ज्याच्या शेतात पाणी त्याची वाणी. यासाठी शासनाकडून मिळणाऱ्या विहीर, बोअरवेलचा फायदा घेऊन उत्तम शेती करावी, असे आवाहन आमदार संजय पुराम यांनी केले. .

श्रीराम विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय चिचगड येथे आयोजित जिल्हास्तरीय कृषी प्रदर्शन व शेतकऱ्यांचा सत्कार समारंभात उद्घाटक म्हणून ते बोलत होते. श्रीराम विद्यालय चिचगड येथे झालेल्या कृषी प्रदर्शन व शेतकऱ्यांच्या सत्कार समारंभ कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार संजय पुराम यांच्या हस्ते व कृषी व पशुधन सभापती शैलजा सोनवाने यांच्या अध्यक्षतेत करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जि.प. उपाध्यक्ष अलताफ हमीद, जि.प. सदस्य उषा शहारे, पं.स. सभापती सुनंदा बहेकार, उपसभापती गणेश सोनबोईर, सरपंच कल्पना गोसावी, देवराज वडगाये, सविता रहांगडाले, सरिता कापगते, माधुरी कुंभरे, देवकी मरई, संगीता भेलावे, गणेश तोपे, अर्चना ताराम, महेंद्र मेश्राम, मेहतरलाल कोराम, नरेंद्र मडावी, लखनी सलामे, अनुप शुक्ला, जी.जी. तोडसाम, जी.आर. शामकुवर उपस्थित होते. कार्यक्रमात १६ शेतकऱ्यांचा सपत्नीक शाल, श्रीफळ, साडी व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एम. बी. हिरूडकर यांनी तर संचालन ग्रामसेवक मुनेश्वर यांनी केले. आभार पोहणकर यांनी मानले. कार्यक्रमासाठी एस.एम. पांडे, सुमीत चुलपार, व्ही.एस. बोकडे, रवींद्र पराते, झामरे, विजय कोळेकर, सर्व पं. स. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले..