भोयर शिवारात प्रेमीयुगुलाची आत्महत्या

0
22

यवतमाळ,दि.06- शहरातील दारव्हा मार्गावर असलेल्या भोयर शिवारातील गिट्टी खदाणीजवळ प्रेमीयुगुलाने पाण्यात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवार (दि.6) सकाळी समोर आली. दीपक जाधव (वय-21, रा. कमलेश्वर मंदिर, परिसर, लोहारा) या तरुणाचा मृतांमध्ये समावेश आहे. मृत तरुणी ही अल्पवयीन असून तिचे नाव गोपनिय ठेवण्यात आले आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (दि.3) अल्पवयीन मुलगी ग्रंथालयात जाते असे सांगून घरातून बाहेर पडली होती. दरम्यान, Yong boy and girl dead body found in Yawatmal Daravha Road

सायंकाळी उशीरापर्यंत ती घरी न आल्याने तिच्या नातेवाईकांनी तिची सर्वत्र शोध घेतला. मात्र ती मिळून आली नाही, अखेर सोमवार, दि. ४ फेब्रुवारी मुलीच्या कुटुंबीयांनी लोहारा पोलीस ठाण्यात मिसिंगीची तक्रार दाखल केली. तर युवक दीपक हा देखील बेपत्ता असल्याची तक्रार जाधव कुटुंबीयांनी दि. ५ फेब्रुवारीला लोहारा पोलीस ठाण्यात दिली होती.  दरम्यान आज बुधवारी दोन दिवसानंतर एका मुलीचा मृतदेह दारव्हा मार्गावर असलेले भोयर शिवारातील गिट्टी खदाणजवळील एका खड्यात तरंगताना आढळून आला. आणि संपूर्ण शहरात ही घटना वाऱ्यासारखी पासरली, दरम्यान उपविभागीय अधिकारी अधिकारी पियुष जगताप, लोहारा पोलीस स्टेशनचे ठाणेदार धर्मा सोनोने, आदींसह पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी काही नागरिकांच्या मदतीने त्या मुलीचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला, त्यावेळी लोहारा पोलीस ठाण्यात मिसिंगीची तक्रार दाखल असलेली ती मुलगी असल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान काही नागरिकांना त्या पाण्यातून बुडबुड्या बाहेर निघतांना आढळून आल्याने संशय निर्माण झाला. त्यामुळे आणखी तीन ते चार इसमांनी पाण्यात उडी घेऊन शोधमोहीम सुरू केली असता दोन तासांच्या अथक परिश्रमानंतर त्या युवकाचा मृतदेह आढळून आला. प्रेमप्रकरणातून ही आत्महत्या झाली असल्याचा संशय पोलिसांकडून वर्तविण्यात आला आहे, या प्रकरणाचा पुढील तपास लोहारा पोलीस स्टेशनचे ठाणेदार सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.