27 C
Gondiā
Saturday, August 15, 2026
Home विदर्भ बिबट्याने केली ५ चितळ, ३ काळविटांसह एका चौसिंग्याची शिकार

बिबट्याने केली ५ चितळ, ३ काळविटांसह एका चौसिंग्याची शिकार

0
73

नागपूर,दि.06: येथील गोरेवाडा भागात असलेल्या प्राणी संवर्धन केंद्रात एका बिबट्याने ५ चितळ, ३ काळवीटसह एक चौसिंग्याला ठार केल्याची घटना आज बुधवारी सकाळी उघडकीस आली.बिबट काटोल मार्गावर असलेल्या गोरेवाडा जंगलातून आल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. विशेष म्हणजे गोरेवाडा केंद्राला सौरउर्जेवरील इलेक्ट्रॉनिक्स तारेचे कुंपण असूनही बिबट्याने ते ओलांडून प्रवेश केला व प्राण्यांवर हल्ला चढवल्याने प्रशासनात खळबळ माजली आहे.