नायब तहसिलदार राजश्री मलेवार व टी.टी.बिसेन एसीबीच्या जाळ्यात

0
18

गोंदिया,दि.07ः- गोंदिया तहसिल कार्यालयात कार्यरत नायब तहसिलदार राजश्री मलेवार व तिलकचंद बिसेन यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज १५००० रुपयाची  लाच घेतांना रंगेहाथ पकडले आहे.पारडीबांध येथील एका फिर्यादीचा तक्रारदाराच्या मलमा वाहतूक करणाऱ्या टिप्परवर दंडाची कार्यवाही न करता टिप्पर सोडून दिल्याचा मोबदला म्हणून तक्रारदाराकडे रु २७५००/- लाचेची मागणी करण्यात आली होती.परंतु लाच देण्याची इच्छा नसल्याने टिप्परचालक फिर्यादींने लाचलुचपत विभागाकडे तक्रार नोंदविली.त्यानुसार 6 फेबुवारी रोजी पडताळणी दरम्यान नायब तहसिलदार तिलकचंद बिसेन यांच्या मार्फेत तडजोड करुन १५०००/- लाच रकमेची मागणी नायब तहसिलदार राजश्री मलेवार यांच्याकरीता करुन तडजोड केली.त्यानुसार आज 7 फेबुवारीला सापळा रचून ही कारवाई करण्यात आली.त्या दरम्यान नायब तहसिलदार राजश्री मलेवार यांनी नायब तहसिलदार बिसेन यांच्यामार्फेत 15 हजार रुपयाची रक्कम स्विकारताच ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई पोलीस अधिक्षक श्रीकांत धिवरे,अप्पर पोलीस अधिक्षक राजेश दुद्दलवार, पोलीस उपअधिक्षक विजय माहुलकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपअधिक्षक रमाकांत कोकाटे, पोहवा.प्रदिप तुळसकर,राजेश शेंदरे,नापोशि.रणजित बिसेन,दिगांबर जाधव,राजेंद्र बिसेन.मनापोशि गिता खोब्रागडे,वंदना बिसेन यांच्या पथकाने केली.