आपली सुरक्षा हीच आपल्या परीवाराची सुरक्षा: एस.एम.नेवारे

0
22
लाखांदुर ,दि.07ः-: आजकाल मनुष्य वाहन घेऊन घराबाहेर गेला की घरी परत येतो की नाही याची शाश्वती नाही कारण रस्ता अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. लोकसंख्या वाढीबरोबरच वाहनांची संख्याही वाढत आहे त्यामुळे रस्त्यांवरील अपघातांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे आपली सुरक्षा हीच परीवाराची सुरक्षा असे मत पोलीस नायक एस. एम. नेवारे यांनी मांडले. ते तालुक्यातील मिशन अधिकारी स्पर्धा परीक्षा केंद्र येथे माता रमाई जयंती तथा रस्ता सुरक्षा पंधरवडा या कार्यक्रमात बोलत होते .
याप्रसंगी सर्वप्रथम माता रमाई यांच्या प्रतिमेस पुष्पहार व दिपप्रज्वलीत करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी विचारमंचावर एस.एम. नेवारे, इंजी. दयाल भोवते व दिपाली महावाडे आदी ऊपस्थित होते.प्रास्तावीक इंजी. दयाल भोवते यांनी केले , ते म्हणाले रस्ता सुरक्षितता हा जिवन मरणाचा प्रश्न आहे .मोठ्या प्रमाणावर रस्ता अपघातांचे प्रमाण वाढले आहे. रस्ता सुरक्षितता ही मनामनात रूजली पाहीजे . हा संस्कार झाला पाहीजे.दिपाली महावाडे यांनी रस्ता सुरक्षिततेचे नियम पाळण्याचे आवाहन केले.
  कार्यक्रमाचे संचालन श्रिकांत लुटे यांनी केले तर आभार प्रदर्शन शितल मेश्राम यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता प्रविण रंगारी, अमित मेंढे, भाग्यश्री कापगते, विठ्ठल मोहुर्ले, किरण मेश्राम, लोकेश कापगते, श्रद्धा टेंभुर्णे , प्रियंका भोवते , स्नेहल दिवठे , तृप्ती परशुरामकर, पल्लवी खरकाटे , गौरव डोंगरे व इतर विद्यार्थ्यांनी परीश्रम घेतले.