सरपंचच्या पतीने केली लिपिकास मारहाण

0
11

गोंदिया,दि.11ः-तालुक्यातील आसोली ग्रामपंचायत येथील लिपिक पदावर कार्यरत कर्मचारी राजानंद प्रेमदास मेर्शाम याला क्षुल्लक कारणावरून सरपंच भागरथा धुर्वे यांच्या पतीने कार्यालयात जाऊन मारहाण केल्याची घटना ७ फेब्रुवारी रोजी घडली. या घटनेची तक्रार ग्रामीण पोलिस ठाण्यात करण्यात आली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मात्र, अद्यापही आरोपीला अटक करण्यात आली नसून, आरोपीला अटक करण्यात यावी, अशी मागणी आयटकचे महासचिव मिलिंद गणवीर यांनी केली आहे.
आसोली येथील ग्रामपंचायतीच्या कामात सरपंचच्या पतीचा नेहमीच हस्तक्षेप असतो. ग्रामपंचायत पदाधिकाठयांसह ग्रामपंचायत कर्मचाठयांशीही त्यांची असभ्य वागणूक असते. अनेक नियम धुळकावून विकासकामांत त्यांचा हस्तक्षेप राहतो. त्यातच ७ पेष्ठब्रुवारी रोजी लिपीक राजानंद मेर्शाम कार्यालयात काम करीत असताना क्षुल्लक कारणावरून सरपंचचे पती लोकचंद धुर्वे यांनी त्यांना मारहाण केली. या घटनेची तक्रार ग्रामीण पोलिस ठाण्यात करण्यात आली असून त्यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, आरोपीला अद्यापही पोलिसांनी अटक केली नाही. आरोपीला अटक करण्यात यावी तसेच कार्यालयीन कामात हस्तक्षेप करून कर्मचार्‍यांना त्रास देण्याची संधी देणार्‍या सरपंचला मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ३९ (१) अन्वये पदमुक्त करण्यात यावे, अशी मागणीही आयटकच्यावतीने करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, ग्राम विकास विभागाचे स्थानिक स्वराज्य संस्थेतील पदाधिकार्‍यांसाठी आचार संहिता लागू केली आहे. त्यात त्यांच्या निकटच्या कोणत्याही व्यक्तीने हस्तक्षेप करू नये, असा उल्लेख आहे. याचे उल्लंघन झाल्याने कारवाई करावी, अशी मागणी मिलिंद गणवीर यांनी केली आहे.