30.7 C
Gondiā
Saturday, July 4, 2026
Home गुन्हेवार्ता वर्षभरात ९ नक्षलवादी ठार, २२ नक्षलींना अटक

वर्षभरात ९ नक्षलवादी ठार, २२ नक्षलींना अटक

0
44

गडचिरोली,दि.01ः- पोलीस दल व नक्षलवादी यांच्या वर्षभरात २३ चकमकी झाल्या असून त्यामध्ये ९ नक्षलवादी ठार करण्यात पोलिसांना यश आले. नक्षल्यांनी घातपाताच्या दृष्टीने पेरून ठेवलेले १४२.५00 किलोग्रॅम वजनाचे लॅन्डमाईन्स, क्लेमोर माईन्स जप्त करण्यात आल्याने अनुचित प्रकार टाळण्यास पोलीस दल यशस्वी ठरले. गडचिरोली पोलीस दलाने यावर्षी दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीचे सदस्य असलेल्या जहाल नक्षलवादी उप्पगुंटी निर्मलाकुमारी ऊर्फ नर्मदा व तिचा पती राणी सत्यनारायणा ऊर्फ किरण यांच्यासह एकूण ७४ लाख बक्षीस जाहीर असलेल्या २२ नक्षलवाद्यांना अटक करण्यात यश प्राप्त केले. यामध्ये डी. के. एस. झेड, सी. मेंबर २, दलम कमांडर १ दलम सदस्य ४, पार्टी मेंबर १३ यांचा समावेश असल्याची माहिती गडचिरोली जिल्हा पोलीस दलाने पत्रकातून दिली.
गडचिरोली पोलीस दलाच्या सी-६0 कमांडोंनी वर्षभरात राबविलेले यशस्वीपूर्ण नक्षलविरोधी अभियानामुळे सन २0१९ मध्ये झालेल्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूक व विधानसभा निवडणुक जिल्ह्यातत निर्विघ्नपणे पार पाडण्या यश मिळाले. नक्षल्यांनी जिल्हाभरात ठिकठिकाणी बॅनर बांधून नागरिकांना मतदान प्रक्रियेत सहभागी न होण्याचे आवाहन केले होते. या पार्श्‍वभूमीवर मतदानाची टक्केवारी ढविण्यासाठी गडचिरोली पोलीस दलाने विविध कार्यक्रम राबविल्यामुळे लोकसभा निवडणुकीमध्ये जिल्हा मतदानाच्या टक्केवारीत महाराष्ट्रात प्रथम स्थानी व विधानसभा निवडणुकीत दुसर्‍या स्थानावर राहीला.
गडचिरोली पोलीस दलाने सातत्यपूर्ण नक्षलविरोधी अभियान यशस्वीपणे राबविल्यामुळे लोकसभा, विधानसभा निवडणुकीमध्ये नक्षलवादावर वचक ठेवत कोणताही अनुचित प्रकार घडू न देता केलेली यशस्वी कामगिरीमुळे माओवाद्यांचे मनोबल ढासळण्यास मदत मिळाली. नागरी कृती शाखेमार्फत गडचिरोली पोलिसांनी जिल्हाभर आदिवासी बांधवांकरिता घेतलेले जनजागरण मेळावे, शांती मेळावे, ग्रामभेटी तसेच नवजीवन योजनेअंतर्गत जे तरूण-तरूणी नक्षलमध्ये भरती झाले आहेत, त्यांच्या घरी पोलिसांनी जाऊन त्यांना सुखी जीवनाचे महत्त्व पटवून सांगितल्याने व नक्षल नातेवाईकांसाठी दिलेली मदत व आयोजित सहलीमुळे त्यांच्या मनात पोलीस दलावर निर्माण झालेला विश्‍वास याचाच परिणाम म्हणून वर्षभरात एकूण १ कोटी ८0. लाख रुपये बक्षीस असलेले ३४ जहाल माओवाद्यांनी आत्मसर्मपण केले आहे. इतिहासात पहिल्यांदाच चातगाव दलम कमांडरसह संपूर्ण चातगाव दलमने आत्मसर्मपण केले आहे.
पोलीस दलाने अतिशय प्रभावीपणे नक्षलविरोधी अभियान राबविल्यामुळे सन २0१९ मध्ये आजपर्यंत एकूण ३४ माओवाद्यांनी आत्मसर्मपण केले असून यात ३ डिव्हीसी, २ दलम कमांडर, २ दलम उपकमांडर, २६ सदस्य, १ जनमिलीशिया यांचा समावेश आहे. सन २00५ पासून आजपर्यंत एकूण ६६३६ माओवाद्यांनी आत्मसर्मपण केले आहेत. तर २२ माओवाद्यांना अटक करण्यात पोलिसांना यश प्राप्त झाले आहे. यामध्ये के.एस.झेड.सी. मेंबर २, दलम कमांडर १, सदस्य ४, पार्टी मेंबर २, सर्मथक १३ यांचा समावेश आहे.
विकासकामांना रोखणार्‍या माओवाद्यांवर पोलीस दल सक्षमपणे कारवाई करण्यास तत्पर असून जे माओवादी विकासाच्या प्रवाहात सामील होण्यास इच्छुक असतील त्यांनी विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच लोकशाहीतील सन्माने जीवन जगण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सर्वतोपरी मदत करेल, असे आवाहन पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी केले.