32.7 C
Gondiā
Tuesday, June 23, 2026
Home विदर्भ विस्तार अधिकाèयाची सरपंचासोबत असभ्य वागणूक

विस्तार अधिकाèयाची सरपंचासोबत असभ्य वागणूक

0
32

गोरेगाव,दि.०६ः चौदाव्या वित्त आयोगांतर्गत गावाच्या विकासकामांचा अंदाजपत्रक प्रकल्प अहवाल तांत्रिक मंजुरीकरिता विस्तार अधिकारी अनिल गिèहेपुंजे यांच्या कार्यालयात नेला. परंतु गटविकास अधिकारी उपस्थित असल्याने तत्काळ स्वाक्षरी करा, असा आग्रह मी धरला. यावर विस्तार अधिकाèयांनी माझ्यासोबत असभ्य वागणूक केली. अशा बेजबाबदार अधिकाèयास निलंबित करण्यात यावे, अशी तक्रार पूरगावचे सरपंच अनंता ठाकरे यांनी ३ जानेवारी रोजी जिप मुख्य कार्यकारी अधिकाèयांकडे केली आहे. निलंबनाची कारवाई न केल्यास पंससमोर साखळी उपोषणावर बसण्याचा इशाराही ठाकरे यांनी दिला आहे. सरपंच ठाकरे यांनी केलेल्या तक्रारीनुसार, पूरगाव येथे १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून जिप शाळा, अंगणवाडी केंद्रातील शौचालय दुरुस्ती, सौंदर्य प्रसाधन, शोषखड्डे खोदणे आदी विकासकामांच्या अंदाजपत्रक प्रकल्प अहवालावर गटविकास अधिकारी झामqसग टेंभरे यांनी विस्तार अधिकारी गिèहेपुंजे यांची स्वाक्षरी घेण्यास सांगितले. त्यामुळे ठाकरे यांनी विस्तार अधिकारी कार्यालयात जाऊन प्रकल्प अहवाल दाखवून स्वाक्षरी करण्याची विनंती केली. त्यावर विस्तार अधिकाèयांनी असभ्य वागणूक करीत म्हटले की, तुमच्या सारखे ५५ सरपंच येतात. मी तुम्हाला ओळखत नाही, ग्रामसेवकाला पाठवा. ते तुमचे काम नाही. मला स्वाक्षèयाच करायचे काम आहे काय,असे ते बोलले. वरिष्ठ अधिकाèयांच्या अशा वर्तवणुकीमुळे ठाकरे यांनी गटविकास अधिकाèयांना आपबिती सांगितली. परंतु त्यांनीही कोणतेच उत्तर दिले नाही. त्यामुळे त्यांनी मुख् कार्यकारी अधिकाèयांकडे विस्तार अधिकाèयांची तक्रार केली.शिस्तभंगाची कारवाई करून निलंबित करण्याची मागणी सरपंचांनी केली आहे. मुख्य कार्यकारी अधिकाèयांनी कारवाई न केल्यास पंचायत समिती कार्यालयासमोर साखळी उपोषणाचा इशारा सरपंच ठाकरे यांनी दिला आहे.यासंदर्भात गटविकास अधिकारी झामqसग टेंभरे यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, विस्तार अधिकारी अनिल गिèहेपुंजे यांनी असभ्य वागणूक केल्याने सरपंच ठाकरे यांनी मुख्य कार्यकारी अधिकाèयांकडे तक्रार केली आहे. त्यामुळे विस्तार अधिकाèयांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.