आमगाव ,दि.३०ः-आमगाव वनपरिक्षेत्रातंर्गत येत असलेल्या कुंभारटोली कं.न.१०८० मध्ये इलेक्ट्रिक करंटच्या माध्यमातून हरणाची शिकार करण्यात आल्याची घटना २९ जानेवारीच्या रात्री १० ते ११ वाजेदरम्यान घडल्याची उघडकीस आली.याप्रकरणात वनाधिकाèयानी आरोपीविरुध्द गुन्हा नोंदविला असून १० संशयीत आरोपीपैकी २ फरार झाले तर ८ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.घटनास्थळावरुन हरणाचे अर्धवट भाजलेला मृतदेह ताब्यात घेण्यात आले असून याप्रकरणात रामेश्वर बिसराम बिसेन(वय५०),देवेंद्र बाबुलाल चौधरी(वय ३६),नरेश यादोवराव रहागंडाले(वय३६)सर्व राहणार बिरसी,व्यकंट दशरथ परसमोळे(वय ३५),सुरेश धनराज राऊत(वय२८),राहुल मधु पाऊलझगड(वय२९),राजू भैय्यालाल मरकाम(वय२५) व कुणाल राजेश साखरे कुंभारटोली(वय २०) यांना ताब्यात घेण्यात आले आहे.याप्रकरणाचा तपास सहाय्यक वनसरंक्षक एम.आर.शेख यांच्या मार्गदर्शनात वनक्षेत्राधिकारी पी.बी.चन्ने यांची चमू करीत आहे.





