38 C
Gondiā
Sunday, June 21, 2026
Home गुन्हेवार्ता कापसी वाघ शिकार प्रकरणी सहा आरोपींना अटक

कापसी वाघ शिकार प्रकरणी सहा आरोपींना अटक

0
18

सावली,दि.03ःतालुक्यातील कापसी वनविभाग क्षेत्रात वाघ व रानडुक्कर शिकार प्रकरणी पाच आरोपींना न्यायालयीन कोठडी तर एका आरोपीला वनकोठडी सुनावण्यात आली आहे. न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावे सुरेश गेडाम, संजय गेडाम, सुरेश भोयर, अजय मेर्शाम, बंडू गेडाम सर्व रा. कापसी असे आहे. तर वनकोठडी सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव दिलीप भोयर रा. कापसी असे आहे. त्याला तेलंगणातून अटक करण्यात आली आहे.
डुकरांना मारण्यासाठी शिकार्‍यांनी ११ केव्हीच्या जिवंत विद्युत तारा लावल्या होत्या. परंतु डुकराऐवजी त्यात वाघ अडकला. विद्युत तारांच्या स्पर्शाने त्याचा मृत्यू झाला होता. त्यामुळे शिकार्‍यांचे धाबे दणाणले. अटकेच्या भीतीपोटी शिकार्‍यांनी नजिकच्या शेतात वाघाला जाळले. मात्र वाघ पूर्णपणे जळाला नसल्याने त्याचा उर्वरित भाग शेतातच पुरण्यात आला होता. प्रकरण शांत झाले असे शिकार्‍यांना वाटले. शिकार्‍यांनी दारूच्या नशेत याबाबत वाच्यता केल्याने प्रकरणाचे बिंग फुटल्याने वनविभागाची झोप उडाली. वनकर्मचारी व अधिकार्‍यांनी आरोपींना अटक केली. वनविभागाने पुरलेल्या वाघाची कवटी, सर्व दात, इतर हाडे व वर्धा येथून मिशा व वाघाचा पंजा जप्त करण्यात आला