35.6 C
Gondiā
Saturday, June 20, 2026
Home गुन्हेवार्ता तीन ट्रकसह ७९ जनावरांना घेतले ताब्यात

तीन ट्रकसह ७९ जनावरांना घेतले ताब्यात

0
49

गोंदिया,दि.14ःराष्ट्रीय महामार्ग क्र. सहावरील मासुलकसा घाट येथे नाकाबंदी दरम्यान कत्तलखान्याकडे जाणार्‍या ३ ट्रकमधून ७९ जनावरे असा ८१ लाख १0 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई गोंदिया स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने १२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास केली.
स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक फौजदार लिलेंद्र बैस हे आपल्या ताब्यासह पेट्रोलिंगवर असताना त्यांना राष्ट्रीय महामार्ग ६ ने रायपूर येथून काही ट्रक जनावरांना नागपूर येथील कत्तलखान्याकडे नेत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे त्यांनी आपल्या ताब्यासह मासुलकसा घाटात नाकाबंदी केली. यावेळी ट्रक. क्र. एमएच ३५/एफ २११७ मधून २३ जनावरे, सीजी 0४/डब्ल्यू ६६४४ मधून २२ जनावरे व सीजी 0८/ओएल ११0२ मधून ३४ जनावरे असा एकूण ८१ लाख १0 हजाराचा मुद्येमाल ताब्यात घेतला. या प्रकरणी देवरी पोलीस स्टेशमनमध्ये ट्रकचालकांसह त्यांना दोन कारमधून सुरक्षेच्या दृष्टीने पायलेटींग करीत असलेल्या ७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून ५ जणांना अटक करण्यात आली आहे.
शाळेतून साहित्य लंपास
आमगाव : तालुक्यातील साकरीटोला येथील जिप कन्या शाळेतून शैक्षणिक साहित्य चोरी झाल्याची घटना १२ फेब्रुवारी रोजी घडली. अज्ञात चोरट्याने शाळेच्या सभागृहात ठेवलेले एम्लीफायर, पिंट्रर, स्पीकर, वायफाय संच, पॉवर बॅग, कॉडलेस माईक असा एकूण २९ हजाराचे साहित्य चोरी केले. फिर्यादी मनोज उत्तम राठोड यांच्या तक्रारीवरुन आमगाव पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.