आमगाव,दि.18ः- राज्य उत्पादन शुल्क विभागाने येथील कामठा मार्गावरील बनावटी देशी दारु कारखान्यावर धाड टाकली. यावेळी सहा आरोपींना अटक करुन ३ लाख ८ हजार ४८0 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई १७ मार्च रोजी मध्यरात्री करण्यात आली.
राज्य उत्पादन शुल्क गोंदियाचे अधीक्षक प्रविण तांबे यांना खबड्ढयामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने १७ मार्च रोजी पहाटे दीड वाजता कामठा मार्गावरील वॉर्ड क्र. २ मधील संदीप असाटी यांच्या घराशेजारील गोठ्यात अवैधरित्या सुरु असलेल्या बनावटी देशी दारु कारखान्यावर धाड टाकली. यावेळी तेथे सहा जण अवैधरित्या बनावटी दारु तयार करताना आढळून आले. यात सिद्धांत भाऊराव नंदगवळी (२९), संतोष मंसाराम वाघमारे (३९), आनंद राजेश नागपुरे (२३), कैलाश दिनेश इनवते (३२), पवन ग्यानीराम शहारे (३३) सर्व रा. गोंदिया व नागेश्वर मनोज धमगाये (२३) रा.कुड्ढहाडी यांचा समावेश असून त्यांना अटक करण्यात आली आहे. घटनास्थळावरुन ११५ बॅ.लि. तयार केलेली दारु, १५0 बॅ.लि. स्पीरिट, ४0 पेट्या बनावटी देशी दारु, ९0 मिली रॉकेट देशी दारुचे लेबल असलेल्या ४ हजार देशी दारुच्या रिकाम्या बाटल्या अर्क, इलेक्ट्रीक मोटार, स्पीरिटच्या वापरासाठी २00 लीटर क्षमतेचे २ ड्रम, २0 पाण्याच्या रिकाम्या कॅन व एक चारचाकी वाहन असा एकूण ३ लाख ८ हजार ४८0 रुपयांचा मुद्येमाल जप्त करण्यात आाला. आरोपींवर महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई गोंदियाचे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक प्रविण तांबे यांच्या नेतृत्वात देवरीचे निरीक्षक सुनील परळे, दुय्यम निरिक्षक संजय गायकवाड, सुहास झांजुर्णे, एच. इंगळे, सी. आय. हुमे, जवान ढाले, फुंडे, मुनेश्वर, मडावी, भोंडे, साखरे यांनी केली.





