31.1 C
Gondiā
Wednesday, June 24, 2026
Home गुन्हेवार्ता न.प.चा लिपिक बोरकर एसीबीच्या जाळ्यात

न.प.चा लिपिक बोरकर एसीबीच्या जाळ्यात

0
530

गोंदिया,दि.१९ः- जमिनीच्या वारसान हक्काने सातबारा उतार्‍यावर नावे नोंदविण्यासाठी २00 रुपयांची लाच घेणार्‍या नगर परिषदेच्या कनिष्ठ लिपीकाला गोंदिया लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १८ मार्च रोजी रंगेहाथ पकडले. शरद भाऊराव बोरकर असे लाच घेणार्‍या कर्मचार्‍याचे नाव आहे.
तक्रारकर्ते हे मजुरीचे काम करीत असून त्यांचे वडील स्व.जैपाल ढबाले यांच्या नावाने १ हजार ९५0 चौ. फुट वडीलोपार्जीत जमीन आहे. या मालमत्तेचा क्र. ७/३0७ असा आहे. या जमिनीचे तीन हिस्यात वाटणी करण्यात आली होती. यापैकी तिसर्‍या हिस्यातील जमिनीचा तुकडा रिकामा आहे. या रिकामा जागेवर तक्रारकत्याची आई सागनबाई, दोन भाऊ गजनन व रामदास व बहिणी लता टांगले, स्व. कविता चौधरीचा मुलगा देवेंद्र चौधरी तसेच तक्रारकत्याचे नाव वारसान हक्काने सातबारा उतार्‍यावर नोंदविण्यासाठी नगर पालिकेचे कनिष्ठ कर्मचारी शरद बोरकर यांनी तक्रारकत्याकडे २00 रुपयांची लाच मागितली. याप्रकरणी त्यांनी गोंदिया एसीबीकडे तक्रार केली. तक्रारीनुसार, एसीबी पथकाने १८ मार्च रोजी नपच्या कर विभागाच्या कार्यालयात सापळा रचून पंचासमक्ष कनिष्ठ लिपीक बोरकर यांना तक्रारकत्याकडून २00 रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. त्यांच्यावर शहर पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई एसीबीच्या पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर, अप्पर पोलीस अधीक्षक राजेश दुद्दलवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपअधीक्षक रमाकांत कोकोटे, स.फौ. शिवशंकर तुंबडे, विजय खोब्रागडे, पो.ह. प्रदिप तुळसकर, राजेश शेंद्रे, ना.पो.शि. डिगांबर जाधव, नितीन रहांगडाले, राजेंद्र बिसेन, वंदना बिसेन, गीता खोब्रागडे, देवानंदन मारबते यांनी केली.