25.3 C
Gondiā
Saturday, August 1, 2026
Home गुन्हेवार्ता 23 लाखांचा दारुसाठा नष्ट,राजूरा पोलीसांची कार्यवाही

23 लाखांचा दारुसाठा नष्ट,राजूरा पोलीसांची कार्यवाही

0
86

चंद्रपूर,दि.08ः जिल्ह्यात दारुबंदी असली तरी येथे दारु सहज उपलब्ध होत असते. तळीरामांचा कोरडा पडलेला घसा ओला करण्यासाठी अवैध दारुविक्रेते जिल्ह्यात  सक्रिय आहे. या अवैध दारुविक्रेत्या विरोधात धाड टाकून गेल्या वर्षभरात विविध कार्यवाहीत राजूरा पोलीसांनी 23 लाखांचा दारुसाठा जप्त केला होता.तो जप्त केलेला 23 लाखांचा दारुसाठा पोलीसांनी न्यायालयाच्या परवानगीने 7 मे रोजी  नष्ट केला.
पोलिसांनी गेल्या वर्षभरात ११२ कारवाईत केलेला २३ लाख ५४ हजार १७० रुपयांचा दारुसाठा राजस्व विभागाच्या परवानगीने नष्ट करण्यात आला.शासनाने दारुबंदी केली आहे. मात्र राजुरा तालुक्यात अवैध मार्गाने दारुची विक्री सुरु आहे.अनेक दारुविक्रेत्यांना अटक केली होती.