30.7 C
Gondiā
Saturday, August 1, 2026
Home गुन्हेवार्ता रेल्वे आरक्षित तिकीटांचा काळाबाजार करणारा जाळ्यात

रेल्वे आरक्षित तिकीटांचा काळाबाजार करणारा जाळ्यात

0
406

गोंदिया,दि.30ःकोरोना विषाणूचा संसर्ग थांबविण्यासाठी सर्व प्रकारची वाहतूक व्यवस्था बंद आहे. त्यात रेल्वेचाही समावेश आहे. मात्र १ जूनपासून काही रेल्वे प्रवासी गाड्या सुरू होत आहेत. त्या अनुषंगाने ऑनलाईन तिकीट विक्री सुरू झाली आहे. या संधीचा लाभ घेत आरोपीने ई-तिकीटचा काळाबाजार करून प्रवास्यांना तिकीट देतांना त्या आरोपीला रंगेहाथ पकडण्यात आले.
सविस्तर असे की, १ जूनपासून गोंदिया स्थानकावरून काही ट्रेन जाणार आहेत. त्या अनुषंगाने ऑनलाईन तिकीट विक्री सुरू झाली आहे. याच संधीचा लाभ घेत आयआरसीटीसीचा अधिकृत एजेंट नसतांनाही आरोपीने ई-तिकीट विक्रीचा गोरखधंदा सुरू केला. ही बाब पोलिसांना माहिती पडताच पोलिसांनी आरोपीला पकडून त्याच्याकडून ५ नग ई-तिकीट किंमत १० हजार १४४ रुपये, एक लॅपटॉप किंमत १५ हजार रुपये असा एकूण २५ हजार १४४ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. आरोपीला रेल्वे सुरक्षा बल क्राईम ब्रांच गोंदिया येथे आणून पुढील कारवाईसाठी रेल्वे सुरक्षा बलकडे सुपूर्द करण्यात आले. विशेष म्हणजे गोंदियात यापूर्वीही रेल्वे तिकीट विक्रीचा गोरखधंदा उजागर झाला आहे. परंतु सद्या संचारबंदीचा लाभ घेत अनेक नागरिक परराज्यात अडकले असल्याने त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधून त्यांना भुलथापा देऊन आपले फावले कसे होईल, या नादात दलाल सक्रीय झाले आहेत. अशा दलालांपासून व भुलथापापासून नागरिकांनी सतर्वâ रहावे, असेही आव्हान रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.