30.7 C
Gondiā
Tuesday, August 4, 2026
Home गुन्हेवार्ता पोलिसाची ७ वर्षीय चिमुकल्यासह महिलेस मारहाण,कारवाईस टाळाटाळ

पोलिसाची ७ वर्षीय चिमुकल्यासह महिलेस मारहाण,कारवाईस टाळाटाळ

0
674

गोंदिया,दि.03ः करोना विषाणूच्या पार्श्वभुमीवर जीव मुठीत घेवून पोलीस यंत्रणा कर्तव्य बजावत असल्याने त्यांना जनताही सहकार्य करीत त्यांच्या या कार्याबद्दल आभार व्यक्त करीत असताचना काही निवडक पोलीस दारुप्राशन करुन व्यसनाच्या  आहारी जावून सर्वसामान्य नागरिकांना दबंगगिरीचा परिचय देत आहेत. अशीच घटना साई माहुली कॉलनी फुलचूर पेठ येथे दोन दिवसांपूर्वी घडली. एका मद्यपी पोलिसाने ७ वर्षीय चिमुकल्यासह त्याच्या आजीला बेदम मारहाण केली.त्यानतंर या घटनेची तक्रार करायला गेलेल्या ग्रामीण पोलीस ठाण्यातही तक्रार घ्यायला सुरवातीला टाळाटाळ करण्यात आली.नंतर मात्र तक्रार स्विकारली गेली.पंरतु मारहाण झालेल्यांची वैद्यकीय तपासणी करायला पोलिसांनी पुढाकार न घेतल्याने तक्रारकर्त्यांनीच स्वतःरुग्णालयात जाऊन वैद्यकीय तपासणी करुन घेतली.एका पोलीस कर्मचार्याविरुध्द तक्रार असल्याने आणि तो दारुडा पोलीस कर्मचारी हा पोलीस अधिक्षक कार्यालयातील असल्याने कारवाईसाठी जाणीवपुर्वक दुर्लक्ष करण्यात आल्याचे नागरिकांचे म्हणने आहे.

या घटनेमुळे पोलिसांच्या प्रामाणिक कर्तव्यावर गालबोट लावले आहे. सविस्तर असे की, फूलचूर पेठच्या साई माहुली वॉर्ड येथील वैभव प्रदिप बन्सोड (०७) हा चिमुकला घराबाहेर खेळत होता.दरम्यान शेजारी राहणारा मद्यपी पोलीस कर्मचार्याने त्याला काठीने बेदम मारहाण केली. ही बाब निदर्शनास येताच चिमुकल्याची आजी मुक्ताबाई बन्सोड ही सोडविण्यासाठी गेली असता तिला देखील अश्लिल शिवीगाळ करीत गालावर व हातावर मारहाण केली. या घटनेची तक्रार गोंदिया ग्रामीण पोलिस ठाण्यात पीडितांकडून करण्यात आली. मात्र, पोलिसांनी देखील अदाखल पात्र गुन्हा दाखल करून त्या मद्यपी पोलिसाची पाठराखण केली.त्यातही मारहाण करणारा दारुडा पोलीस हा माझे कोण काय बिघडवतो,पुर्ण पोलीसविभागच माझ्या पाठिशी आहे असे बोलून परिसरात धाक दाखविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे तक्रारकर्त्यांचे म्हणने आहे.दारुड्या व मारहाण करणार्या पोलिसावर कारवाई करण्यात आली नसल्याने पीडित महिलेने जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे तक्रार केली आहे. मद्यपी पोलीस अधिकार्याच्या कृत्यामुळे पोलिसांचे प्रमाणिक कर्तव्याला गालबोट लागले आहे. त्या पोलीस
कर्मचाNयावर पोलीस अधिक्षक कार्यवाही करणार काय? याकडे लक्ष लागले आहे.