30.6 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home गुन्हेवार्ता रेलवे रुळावर आढळला दोन महिन्याचा बाळाचा मृतदेह       

रेलवे रुळावर आढळला दोन महिन्याचा बाळाचा मृतदेह       

0
507

गोंदिया,दि.03- आईच्या प्रेमा इतके स्वच्छ निर्मळ प्रेम कोणतेच नसते मात्र तीच आई जर आपल्या पोटच्या मुलाच्या जीवनावर उठली तर याला काय म्हणावे असाच प्रकार गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्याच्या धानोली परिसरात बघावयास मिळाला.धानोली रेल्वेस्टेशनपासून काही अंतरावरील रेल्वे रूळाशेजारी अवघ्या दोन महिन्याच्या बाळाला टाकून निघून गेल्याने एकच खळबळ उडाली आहे.सविस्तर असे की,नागपूर- रायपूर रेल्वे मार्गावर आज सकाळी सालेकसा तालुक्यातील धानोली-दरबडा गावादरम्यान दोन महिने वयाच्या बाळाचा मृत्यूदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली. तत्काळ याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी मृत्यूदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदना करिता ग्रामीण रुग्णालयात पाठविले. ते बाळ कुणी तिथे आणून ठेवले.हे अद्याप कळु शकले नाही. बाळाला मृतावस्थेत फेकण्यात आले की, फेकल्यानंतर बाळाचा मृत्यू झाला. हे गुलदस्त्यात आहे. या प्रकरणाचा सालेकसा पोलीस करीत आहेत. या घटनेमुळे मात्र शोक व्यक्त करण्यात येत आहे.