आमगाव,दि.04ः येथे चोरांचा धुमाकूळ वाढला असुन घरफोडीचे प्रकरण वाढले आहे. आमगाव येथील गोंदिया रोडवर असलेले यशवंत नगर मधील तेजराम उके यांच्या घरी मध्यरात्रीच्या सुमारास काही चोरांनी घरफोडी करून स्वर्ण आभूषण सह मिक्सर मशीन असे एकूण तीस हजार पाचशे रुपये किमतीचे वस्तूची चोरी केली .
तेजराम उके हे एकदिवस आधीच आपल्या मूळ गावी मानेगाव येथे गेले होते. घर निर्जन असल्याने चोरट्यांनी डाव साधला.आमगाव येथे याच नगरात दोन दिवस आधी मेंढे कुटुंब यांच्या आवारातील कपड्याची झडती करून आठशे रुपये रोख चोरांनी पळवून नेली विशेष म्हणजे मेंढे हे इसम शिक्षक असून त्यांची शाळेत( कोरोनटाईन) सेंटर वर ड्युटीवरून घरी परत आल्यावर वापरातील असलेले कपडे त्यांनी घरातील आवारातच खुंटी ला अडकून ठेवले होते चोरांनी त्या कापडच्या खिश्यातील पाकिटातून रक्कम पसार केली. आमगाव येथील चोरांचा वाढत वाढत असलेला धुमाकूळ नागरिकांसाठी चिंता वाढवीली आहे. चोरीचा तपास पोलीस करीत आहे.




