30.9 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home गुन्हेवार्ता वनविभागाचे कार्यालय जाळून दोन वनरक्षकांना मारहाण

वनविभागाचे कार्यालय जाळून दोन वनरक्षकांना मारहाण

0
254

गडचिरोली,दि.१०: सशस्त्र नक्षलवाद्यांनी काल(दि.९)रात्री एटापल्ली तालुक्यातील गट्टा(जांभिया) वनपरिक्षेत्र कार्यालयाची जाळपोळ करुन दोन वनरक्षकांना मारहाण केली.काल राञी १० ते १५ सशस्त्र नक्षलवादी वनपरिक्षेत्र कार्यालयात गेले. त्यांनी दोन वनरक्षकांना दमदाटी करुन कार्यालयातील काही कागदपत्रे व फर्निचरला आग लावली. त्यानंतर नक्षली दोघांनाही मारहाण करुन त्यांच्याकडील मोबाईल घेऊन गेले. रात्रीच दोन्ही वनरक्षकांना आलापल्ली येथे आणण्यात आले. सद्या तेंदूपानांचा हंगाम सुरु आहे. अशावेळी नक्षल्यांनी वनरक्षकांना मारहाण केल्याने परिसरात दहशत निर्माण झाली आहे.