24.8 C
Gondiā
Monday, August 10, 2026
Home शैक्षणिक निबंध स्पर्धेत प्रोग्रेसिव्ह शाळेचे विद्यार्थी प्रथम

निबंध स्पर्धेत प्रोग्रेसिव्ह शाळेचे विद्यार्थी प्रथम

0
46

गोंदिया,दि.२१ -स्वर्गीय मनोहर भाई पटेल यांच्या स्मृती दिनी भारतीय नवयुवक विद्यार्थी संघटनेतर्फे निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत प्रोग्रेसिव्ह शाळेच्या विद्याथ्र्यांनी प्रथम क्रमांक मिळविले आहे.या स्पर्धेत जिल्ह्यातील अनेक शाळेच्या विद्याथ्र्यांनी सहभाग घेतला होता. स्वर्गीय मनोहरभाई पटेल यांचे गोंदिया भंडारा जिल्ह्याच्या विकासासाठी केलेले महत्त्वपूर्ण योगदान या विषयावर निबंध लिहून प्रोग्रेसिव्ह शाळेच्या विद्याथ्र्यांनी प्रथम क्रमांक मिळविला. भारती ब्राम्हणकर, या विद्यार्थिनीने ्प्रथम क्रमांक मिळविला तर तृतीय पुरस्कार हर्षा खोब्रागडे या विद्यार्थीनीने पटकाविले. कार्यक्रमाचे अध्यक्ष हरीहर भाई पटेल, हुकूमचंद अग्रवाल, हिरालाल जायस्वाल, अनिता शर्मा, हितेश बिसेन, शैलेश जायस्वाल आदींची उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते यश संपादन करणा-या विद्याथ्र्यांना स्मृतिचिन्ह व प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

blank