मुंबई विद्यापीठ-आयडॉलच्या एमसीए प्रवेश परीक्षेसाठी अर्ज सुरू

0
452

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेतील मास्टर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन (एमसीए) या अभ्यासक्रमासाठीच्या प्रवेश परीक्षेच्या ऑनलाईन अर्जास सुरुवात झाली असून शेवटची तारीख १८ नोव्हेंबर आहे.

आयडॉलमध्ये २००५ पासून एमसीए हा अभ्यासक्रम सुरू आहे. तीन वर्षांच्या कालावधीचा व सहा सत्र असलेला हा अभ्यासक्रम असून यावर्षीपासून आयडॉलमध्ये प्रथमच एमसीए हा अभ्यासक्रम सीबीसीएस पद्धतीने सुरु होत आहे. या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना ऑनलाईन मार्गदर्शन केले जाते. विद्यार्थ्यांसाठी मुंबईतील अनेक महाविद्यालयात अध्ययन केंद्रे आहेत यामध्ये प्रात्यक्षिक घेतले जातात. दरवर्षी नोकरी करणारे ४०० ते ५०० विद्यार्थी यात प्रवेश घेतात. नोकरी करणाऱ्यांसाठी हा अभ्यासक्रम उपयुक्त आहे.

या अभ्यासक्रमात बारावी किंवा पदवी अभ्यासक्रमात गणित हा विषय असलेले सर्व शाखेतील पदवीधर विद्यार्थी किंवा ज्या विद्यार्थ्यानी अंतिम वर्षाची परीक्षा दिली असेल व त्यांचा निकाल प्रलंबित असेल या विद्यार्थ्यांनाही ही प्रवेश परीक्षा देता येईल.

एमसीए प्रवेश परीक्षेचे ऑनलाईन अर्ज सुरू झाले असून शेवटची तारीख १८ नोव्हेंबर ही आहे. हे प्रवेश अर्ज http://idolmca.digitaluniversity.ac/#/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
ही प्रवेश परीक्षा २५ नोव्हेंबर रोजी ऑनलाईन स्वरूपात होणार आहे. परीक्षा बहुपर्यायी असेल. विद्यार्थी त्याच्या मोबाईलवरून किंवा लॅपटॉपवरून ही प्रवेश परीक्षा देईल. या प्रवेश परीक्षेचा अभ्यासक्रम विद्यापीठाच्या संकेतस्थळावर व आयडॉलच्या लिंकवर उपलब्ध आहे.