आमगाव,दि.४-श्री लक्ष्मणराव मानकर कॉलेज ऑफ एज्युकेशनच्या विद्याथ्र्यांनी विविध परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे.रातुम नागपूर विद्यापीठ नागपूर अंतर्गत सत्र २०१४-१५ मध्ये घेण्यात आलेल्या बी.एड. च्या परीक्षेत या महाविद्यालयाचा निकाल ५७ टक्के असून कु. मंजू रामचंद्र बनोटे या विद्यार्थिनीने ६८.४ टक्के गुण घेत महाविद्यालयातून प्रथम आली आहे. तर सुनील शिवकुमार पाथोडे ६६.४ टक्के गुण घेत द्वितीय क्रमांक मिळविला. तसेच डी.टी.एड. प्रथम वर्षातून कु. ज्योती गुुलाबराव बिसेन या विद्यार्थिनीने ८४.३० टक्के गुण घेत महाविद्यालयातून प्रथम आली आहे. तर कु. सत्यशिला ओंकार बिसेन या विद्यार्थिनीने ८३.६० टक्के गुण घेत द्वितीय क्रमांक मिळविला. डी.टी.एड. द्वितीय वर्षातून कु. अल्का मेघराज चौधरी ८१.७५ टक्के गुण घेत महाविद्यालयातून प्रथम आली आहे. तर कु. रंजिता उद्धव भजने या विद्यार्थिनीने ८१.७० टक्के गुण घेत द्वितीय क्रमांक मिळविला. सर्व गुणवंतांचे अभिनंदन संस्थेचे सचिव केशवराव मानकर, सुरेशबाबू असाटी, प्रमोद कटकवार सर्व संचालक मंडळ, प्राचार्य डॉ. डी.के. संघी, कार्यकारी प्राचार्य जे.यु. बन्सोड व प्राचार्या सड्डल मॅडम तसेच महाविद्यालयातील सर्व अधिव्याख्याता व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.