‘दहशतवादावर‘ प्रोग्रेसिव्ह शाळेत कार्यशाळा

0
8

गोंदिया,दि. ४-श्रीमती उमादेवी बहुउद्देशीय शिक्षण संस्थेद्वारा संचालित प्रोग्रेसिव्ह शाळेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक कार्यालय, दहशतवाद विरोधी पथक नागपूर युनिट नागपूर आणि महाराष्ट्र राज्य पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने दहशतवाद या विषयावर जनजागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
विद्याथ्र्यांना मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्र पोलीस दलाचे अधिकारी ए.टी.एस. नागपूरचे जफरअली सय्यद, मोहन भोयर व एटीसी गोंदियाचे जी.के. वाघ, प्रशांत मेश्राम, मनोज चुटे, संस्थाध्यक्ष पंकज कटकवार व सचिव निरज कटकवार, प्रोग्रेसिव्ह शाळेचे प्राचार्य, प्रशासकीय अधिकारी, पर्यवेक्षक आणि शिक्षकगण उपस्थित होते. दहशतवादाला आडा घालण्यासाठी अधिकाèयांनी विद्याथ्र्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, दहशतवाद जगाची एक गंभीर समस्या आहे. या समस्येचा वास्तविक व अंतिम समाधान अहिंसेद्वारे संभव आहे. दहशतवादाला परिभाषित करणे वाटते तेवढे सोपे नाही. दहशतवादाला रोखण्यासाठी अधिकाèयांनी अनेक उपाय सांगून विद्याथ्र्यांना जागृत करण्याचे कार्य केले.