प्रोग्रेसिव्ह शाळेत आजी-आजोबा दिवस साजरा

0
34

गोंदिया,दि.१३- प्रोग्रेसिव्ह शाळेत मोठ्या उत्साहात आजी-आजोबा दिवस साजरा करण्यात आला. यावेळी शाळेत शिक्षण घेणाèया विद्याथ्र्यांच्या आजी-आजोबांना शाळेत आमंत्रित करण्यात आले. कार्यक्रमाचे अतिथी सुद्धा आजी-आजोबाच होते. प्रोग्रेसिव्ह शाळेच्या विद्याथ्र्यांद्वारा अतिथींचा स्वागत गीताद्वारे करण्यात आले. यावेळी शाळेच्या विद्याथ्र्यांनी आपल्या कला-गुणांचा प्रदर्शन करून गीत, नृत्य, मनोगत तसेच नाट्य प्रस्तुत करून सर्व आजी-आजोबांचे मन मोहून टाकले. अतिथीगणांनी अपाले विचार व्यक्त करतांनी आज समाजात आजी-आजोबांचे महत्त्व स्पष्ट केले. बहुतांशी कुटुंब विभक्त राहणे पसंत करतात पण त्याचमुळे लहान मुलांना संस्कारात कमतरता पडते. आज बहुतांशी आजी-आजोबांना एकटे राहण्याचे दुख सहन करावे लागते.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष पंकज कटकवार, सचिव निरज कटकवार उपस्थित होते. संस्था अध्यक्ष यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात आपले विचार व्यक्त करताना म्हणाले की, मुलांचा हृदय फुला सारखा असतो. मुले आपल्या आजी-आजोबा भोवती फुलपाखरा सारखे बागडत असतात. अनेक नैतिक मूल्य लहान मुले आजी-आजोबापासून शिकत असतात. त्या मुले या दिवसाचे औचित्य साधून सहकुटुंब पद्धतीला महत्त्व देण्याचा प्रयत्न शाळा करत आहे. या कार्यक्रमात वेगवेगळ्या शाखांचे प्राचार्य प्रशासकीय अधिकारी, पर्यवेक्षक, शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन महेंद्र हरिणखेडे यांनी केले. आभार नगमा शाह यांनी मानले.