गोंदिया- दि.13-जिल्हा निवड समिती व जिल्हाधिकारी कार्यालय गोंदियाच्यावतीने सरळ सेवा भर्ता २०१५ करिता तलाठी पदाच्या १७ जागेकरिता अर्ज मागविण्यात आले होते.या पदाकरिता ऑनलाईन फार्म घेण्यात आले असता २९२२ उमेदवारांना पात्र ठरविण्यात आले होते.आज १३ सप्टेंबर रोजी ११ केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली त्यात २२७७ उमेदवारांनी परीक्षेला उपस्थितीत दर्शविली.
गोंदिया शहरातील एकूण ११ परीक्षा केंद्रात सकाळी ११ ते १ या वेळेत ही परीक्षा घेण्यात आली.आदर्श qसधी विद्यालय या केंद्रात ४५६ उमेदवारांची नोंद करण्यात आली होती ज्यापैकी ९५ गैरहजर तर ३६१ उमेदवार परीक्षेला बसले होते. तर एस.एस. गल्र्स कॉलेज मध्ये २४०उमेदवरांपैकी १८७ उमेदवारांनी आपले भाग्य आजमावले तर ५३ उमेदवार गैरहजर होते. नमाद महाविद्यालय ४८० पैकी ३६८ हजर ११२ गैरहजर, मनोहर म्युनिसीपल ज्यू. कॉलेज १४३ नोंदणी केलेल्या उमेदवारांपैकी १०४ हजर तर ३९ गैरहजर, मनोहर म्युनिसीपल हायर सेकंडरी शाळा २८७ पैकी २३२ हजर ५५ गैरहजर, गुजराती नॅशनल शाळा ३६० उमेदवारांपैकी २७४ हजर ८६ गैरहजर, राजस्थान कन्या विद्यालय १८८ उमेदवारांपैकी १५० उमेदवारांनी परीक्षा दिली तर ३८ उमेदवार गैरहजर होते, जे.एम. हायस्कूल १९२ पैकी १५७ हजर ३५ गैरहजर, सरस्वती महिला विद्यालय २४० उमेदवारांपैकी १८५ हजर ५५ गैरहजर, डी. बी. सायंस कॉलेज ९६ पैकी ७५ हजर, २१ गैरहजर तर रqवद्रनाथ टैगोर हायस्कूलमध्ये २४० अर्जदार उमेदवारांपैकी १८४ उमेदवारांनी या परीक्षेला हजेरी लावली तर ५६ उमेदवार गैरहजर राहिले. असे एकूण ११ केंद्रात २ हजार ९२२ अर्ज करणाèया उमेदवारांपैकी २ हजार २७७ विद्यार्थी परीक्षेला बसले.