गोंदिया ,दि.१४: अडचणीत असलेल्या पाच पंचायत समित्यांतर्गत कार्यरत शिक्षकांचे पगार गणेशोत्सवापूर्वी निघणे कठीण होते. मात्र शिक्षण सभापती पी.जी.कटरे यांच्या तत्परतेमुळे जिल्ह्यातील शिक्षकांचे पगार गणेशोत्सवापूर्वी काढण्यात आले आहे. त्याचे असे की, सालेकसा, देवरी व सडक अर्जुनी पंचायत समित्यांचे वेतन कोषागार कार्यालयात पाठविण्यात आले. मात्र निधी अभावी उर्वरीत पाच पंचायत समित्यांचे वेतन अडले होते. याच महिन्यात बहुतांश सणांसह गणेशोत्सव आल्याने त्यावर विरजन पडण्याचे स्पष्ट चिन्ह निर्माण झाले होते. यावर प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष विरेंद्र कटरे यांच्या नेतृत्वात पदाधिकार्यांनी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रचना गहाणे व शिक्षण सभापती पी.जी. कटरे यांची भेट घेतली. आपल्या विभागाची जबाबदारी स्वीकारत कटरे यांनी शिक्षण संचालक कार्यालय (पुणे) यांच्याशी संपर्क साधून जिल्हा परिषदेला ४९ कोटींचा निधी मिळवून दिला. यावेळी शिक्षण सभापती कटरे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.शिक्षक संगाचे अध्यक्ष विरेंद्र कटरे,एस.यु.वंजारी,केदार गोटेफोडे,नागसेन भालेराव,नुतन बांगरे,यशोधरा सोनवाने,नानन बिसेन,शंकर चव्हाण आदी शिक्षक उपस्थित होते.