लहरीबाबा देवस्थानाला ४५ लाखांचा निधी

0
6

साकोली दि.१४: जिल्हा नियोजन समितीमध्ये मंजूर झालेल्या श्री संत लहरीबाबा मठ देवस्थान साकोलीला सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तसेच या मठाचे अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी शासनातर्फे निधी येणारच असला तरी खासदार निधीतून पुन्हा ४५ लाख रुपयाची घोषणा खा. नाना पटोले यांनी शनिवारला केली. पोळ्याच्या दिवशी मठात सदिच्छा भेटीदरम्यान घोषणा केली. तीर्थस्थळाचा आढावा घेऊन तालुक्यातील पोंगेझरा महादेव देवस्थान शिवणटोला व कोल्हासूर पहाडी मंदिर, सितेपार, विर्शी याही मंदिरांना सुविधा पुरविण्याचे आश्वासन दिले.

संत श्री लहरीबाबा हे या पंचक्रोशीतील लोकांचे श्रद्धास्थान आहे. साकोली येथे असलेल्या लहरीबाबा मठ व मंदिराच्या दर्शनासाठी परिसरासह भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, नागपूर या जिल्ह्यातील हजारो भक्तगण दर्शनाकरिता येतात. या उत्सवाला हजारो लोकांची उपस्थिती असते. मंदिर परिसराचे सौंदर्यीकरण तसेच सर्व मूलभूत सोयी सुविधा देण्यासाठी शासन कटीबद्ध असल्याचेही यावेळी नाना पटोले यांनी सांगितले.

यावेळी या देवस्थानाचे अध्यक्ष अशोक गुप्ता, प्रभाकर सपाटे, प्रदीप मासूरकर, माजी उपसरपंच किशोर पोगळे, शहर अध्यक्ष मंदार खेडीकर, माजी आमदार डॉ.हेमकृष्ण कापगते, डॉ.अनिल मारवाडे, श्याम गुप्ता व देवस्थानाचे पदाधिकारी उपस्थित होते.