वर्गखोली लोकार्पण करताना सभापती शिवणकर

0
15

बोंडगावदेवी दि. १0: गावखेड्यातील कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही, यासाठी गावागावांत जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळण्याच्या हेतूने आवश्यक त्या सोयी शाळेला पुरविल्या जात आहे. सर्व सामान्यांच्या पोरांची शैक्षणिक प्रगती करण्यासाठी शिक्षकांनी स्वत:चे दायित्व समजून जागरुकपणे प्रयत्नशील राहण्याचे आवाहन पंचायत समितीचे सभापती अरविंद शिवणकर यांनी केले.
जवळील ग्राम महालगाव येथील जिल्हा परिषद शाळेत नव्याने बांधण्यात आलेल्या वर्गखोलीच्या लोकार्पण समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य गिरीश पालीवाल होते. प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती उपसभापती आशा झिलपे, सदस्य नाना मेश्राम, महागावच्या सरपंच रसीका मारगाये, केंद्रप्रमुख कृपाल बोरकर, शाळा समिती अध्यक्ष हेमंत गोंडाणे, माजी पंचायत समिती सदस्य गगन मारगाये उपस्थित होते.
सर्व शिक्षा अभियानांतर्गत बांधकाम करण्यात आलेल्या या वर्गखोलीचे उद््घाटन शिवणकर यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. संचालन सहा. शिक्षक राजेश मरघडे यांनी केले. प्रास्ताविक मुख्याध्यापक हितेंद्र मेश्राम यांनी मांडले. आभार शाळा समिती अध्यक्ष हेमंत गोंडाणे यांनी मानले.