सावरी आरोग्य उपकेंद्रासाठी ६0 लाख मंजूर

0
8

गोंदिया दि. १0: जि.प. आरोग्य विभागाने सावरी येथे उपकेंद्राचे बांधकाम १५ वर्षांपूर्वी सुरू केले होते. परंतु ग्रामपंचायतीने कंत्राटदारांना बांधकाम करू दिले नव्हते.जि.प. बांधकाम विभागाने निविदा देवून बांधकाम सुरू केले होते. परंतु संधीसाधू लोकांनी उपकेंद्र ग्रामपंचायतला देण्याची मागणी केली होती.
काही असंतुष्ट कंत्राटदारांनी उपकेंद्र बांकामाची जागा झुडपी जंगलाची सांगून तक्रार केली होती. त्यामुळे वनविभागाने सदर काम थांबविले.या बाबीला १५ वर्षांचा कालावधी लोटला व प्रकरण थंडबस्त्यात गेले.
या प्रकरणाची तक्रार शेतकरी कामगार पक्षाचे सचिव चनीराम मेश्राम यांनी मुख्यमंत्री व आरोग्य मंत्रालयाचे सचिव यांना केली.शेवटी जि.प. आरोग्य विभागाने वन विभागाच्या अटी पूर्ण करीत प्रस्ताव मंजूर केले.त्यामुळे जि.प. च्या स्थाई समितीने उपकेंद्राच्या इमारतीसाठी ६0 लाख रूपये मंजूर केले असून लवकरच बांधकाम सुरू होईल, असे चनीराम मेश्राम यांनी कळविले आहे.
याबाबत जि.प. आरोग्य समितीच्या पदाधिकार्‍यांनी १९ मे २0१५ रोजी उपकेंद्राच्या इमारतीबाबत चर्चा करून मंजुरी दिली.२ जून रोजी स्थायी समितीने प्रस्ताव पारित केला व त्याच ठिकाणी उपकेंद्राचा पाया बांधकाम सुरू केला होता. परंतु काम बंद होते. त्याच गट क्रमांक ४३९/९ आरजी 0.१0 हे.आर. जागा उपलब्ध करून दिली असून वनविभागानेही हिरवी झेंडी दिली आहे. उपकेंद्र इमारत व निवास स्थानासाठी सन २0१५-१६ पर्यंत ६0 लाख रूपयांचा खर्च मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे जि.प. चे कार्यकारी अभियंता निविदा मागवून लवकरच काम सुरू करणार आहेत व याचा लाभ लवकरच सावरीवासीयांना मिळणार असल्याचे मेश्राम यांनी सांगितले आहे.