अर्थ-वाणिज्य शिक्षक मंडळाचे शुक्रवारपासून चर्चासत्र

0
10

रामटेक-विदर्भ कनिष्ठ महाविद्यालयातील अर्थ-वाणिज्य शिक्षक मंडळाचे द्वैवार्षिक चर्चासत्र २८ व २९ नोव्हेंबरला रामटेक, गडमंदिर रोडवरील नरेंद्र तिडके महाविद्यालयात आयोजित करण्यात आले आहे. या चर्चासत्राचे उद्घाटन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉ. विनायक देशपांडे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून गोंदिया एज्युकेशन संस्थेचे सचिव राजेंद्र जैन, रामटेक विधानसभा क्षेत्राचे आमदार मल्लीकार्जुन रेड्डी उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.एस. फुलझेले तर मार्गदर्शक म्हणून नागपूर विभागाचे शिक्षण उपसंचालक अनिल पारधी उपस्थित राहणार आहेत. समारोप सोहळ्याला रामटेक क्षेत्राचे माजी आमदार आशीष जयस्वाल, चंद्रपाल चौकसे उपस्थित राहणार आहेत.
चर्चासत्रात भारताच्या आर्थिक विकाससंदर्भात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आर्थिक विचार, आर्थिक सुधारणा व ग्रामीण व नागरी क्षेत्रातील आर्थिक व सामाजिक परिवर्तन व ग्रामीण विकासाकरिता वित्तीय प्रबंधन व प्रशासन या विषयावर शोधनिबंधाचे वाचन व चर्चा केली जाणार आहे.
चर्चासत्राकरिता शिक्षकांसाठी शिक्षण उपसंचालक यांनी दोन दिवसांची रजा मंजूर केली असून चर्चासत्राकरिता ८००रुपये अधिवेशन शुल्क आहे. अधिक माहितीसाठी ८०८७२९९३२९ व ९८५०२९३६४२ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मंडळाचे सचिव प्रा. राजाभाऊ दुरुगकर यांनी केले आहे.