‘वर्ल्ड नंबर वन’ होण्याचे सायनाचे लक्ष्य

0
10
वाढदिवसाच्या शुभेच्छा

हैदराबाद – चायना ओपन सुपर सिरीज स्पर्धेचे जेतेपद पटकावणा-या भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवालचा आत्मविश्वास कमालीचा दुणावला आहे. चायनाचे जेतेपद पटकावत जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानावरुन चौथ्या स्थानी झेप घेणा-या सायनाचे या क्रमवारीत अव्वल स्थान पटकवण्याचे लक्ष्य आहे.
‘हंगामातील तीन जेतेपद पटकावत मी नवव्या स्थानावरुन चौथ्या स्थानी आले याचा मला खूप आनंद आहे. पुढील महिन्यात होणा-या दुबई सुपर सिरीजच्या मध्येही मी चांगली कामगिरी करेन अशी आशा आहे.’ असे सायनाने सांगितले.
यासोबतच मला २०१६ च्या रिओ ऑलिंपिकमध्ये सहभागी होण्यासाठी फिटनेसवरही लक्ष केंद्रित केले पाहिजे. ऑलिंपिक जवळ येत आहे त्यामुळे फिट राहणे गरजेचे आहे. फिटनेस कायम राखत क्रमवारीतील टॉप तीनमधील चीनच्या खेळाडूंना कडवी लढत देणे माझ्यासाठी आवश्यक आहे. या तीनही बलाढ्य खेळाडूंना नमवण्याचा अथवा त्यांना कडवी झुंज देण्याचा मी पूर्ण प्रयत्न करणार आहे. मी माझ्यापरीने सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करेन. क्रमवारीत अव्वल स्थान पटकावण्याचे प्रत्येक खेळाडूचे ध्येय असते. मात्र हे सोपे नाही. चीनचे इतर खेळाडूही चांगले आहे. त्यामुळे मी चांगली कामगिरी करण्यावर लक्ष केंद्रित करणार असल्याचे सायनाने म्हणाली.