महानगरपालिका,नगरपरिषद व कटकमंडळ प्राथमिक,माध्यमिक शिक्षकांचे प्रलंबित समस्या मार्गी लावा

0
46

आमदार परिणय फुके यांच्या नेतृत्वात शिक्षक सहकार संघटनाचे निवेदन ….

गोंदिया,दि.27ः- महाराष्ट्रातील महानगरपालिका,नगरपरिषद व कटकमंडळ प्राथमिक,माध्यमिक शिक्षकांचे प्रलंबित समस्या मार्गी लगाव्यात म्हणून शिक्षक सहकार संघटना महाराष्ट्र राज्यच्यावतीने आमदार डाॅ.परिणय फुके यांच्या उपस्थिति नगर विकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक यांना मंत्रालयात निवेदन देवून सकारात्मक चर्चा करण्यात आली.

महाराष्ट्रात एकूण 27 महानगरपालिका व 228 नगरपरिषद अ वर्ग ब वर्ग क वर्ग अशा तीन वर्गवारीत आहेत तसेच कटक मंडळ सुद्धा आहेत ज्यामध्ये शिक्षकांचे प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत.संबंधित प्रश्न तातडीने सोडविण्याचे संदर्भात शिक्षक सहकार संघटना सतत पाठपुरावा करत असते. आता शिक्षक सहकार संघटनेने राज्यपाल,मुख्यमंत्री तसेच नगर विकास मंत्री याना सुध्दा निवेदन दिले आहे.

निवेदनात 2005 नंतर नियुक्त मनपा,नप व कटक मंडळ मधील शिक्षकांना 1982/84 जुनी पेंशन योजना लागू करने,’ अ ‘ व ‘ ब ‘ वर्ग नगरपरिषद व महानगरपालिका शिक्षकांचे वेतन नगर विकास व शालेय शिक्षण विभाग कडून होत असल्यामुळ दरमहा वेतन उशीरा होत असतो त्यामुळे सदर वेतन दोन विभागाकडून न होता 100%वेतन शिक्षण व क्रीडा विभागाकडून प्रदान करने,शिक्षकांना 10,20,30 सेवाअंतर्गत आश्वासित प्रगती योजना लवकरात लवकर लागूकरने, नगरपरिषद व महानगरपालिकेतील GPF खातेधारक शिक्षकांना शासकीय नियमाप्रमाणे व्याजदर मिळत नाही त्यांचे GPFखाते हे कोषागार मध्ये नसल्याने त्याना व्याज बचत खाते चा मिळत असतो म्हणून त्याना शासन नियमाने व्याजदर मिळणे, शिक्षकांना जिल्हा परिषद् शिक्षकाप्रमाने सण अग्रिम मिळत नाही म्हणून सदर शिक्षकाना सन अग्रिम मिळने , बदल्या संदर्भात निघालेला नगर विकास विभागाच्या शासन निर्णयात दुरुस्ती करने ,एकाच जिल्ह्यातील जिल्हापरिषद शाळा,नगर परिषद् शाळा वा महानगर पालिका शाळत बदली करण्याची मुभा देने. जिल्हापरिषद प्रमाणे नगरपरिषद व महानगरपालिका शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या करावे, बदली झालेल्या शिक्षकांना सेवा जेष्ठतेचा लाभ देण्यात यावे,बदल्यासाठी शिक्षण समितीची तसेच सर्वसाधारण सभेच्या ठरावाची गरज असू नये. शिक्षक संवर्गाच्या 100 बिंदु नामावली नोंदवही अद्यावत करणे,शिक्षक आमदार साठी नगरपरिषद/मनपा प्राथमिक शिक्षकांना मतदानाचा अधिकार मिळणे,शिक्षण सेवकांचे मानधन मानधन 6000रु वरून 20000रु करण्यात करने,अनेक वर्षा पासून रिक्त असलेले प्रशासन अधिकारी/शिक्षण अधिकारी ,केंद्रप्रमुख,विषय शिक्षक,शिक्षक यांचे पद तातडीने भरणे,नगरपरिषद ,महानगरपालिका शिक्षकांची गटविमा कपात करणे,शिक्षकाना कॅश लेस मेडिक्लेम देने. या सह अनेक मागण्याचा समावेश आहे.

आमदार परिणय फुके यांनी सदर मागण्या रास्त असून त्या त्वरीत सोडावाव्यात असे प्रधान सचिव यांना सांगितले. प्रधान सचिव महेश पाठक यांनी सदर मागण्या लवकर सोडविन्याचे आश्वासन दिले. यावेळी राज्याध्यक्ष संतोष पिट्टलवाड, विभागीय अध्यक्ष रविकुमार अंबुले,रवि ढगे,सुरेन्द्र गौतम,लाखेश्वर लंजे उपस्थित होते.