सीएसआर निधीतून बाबरवस्ती(पांडोझरी) मराठी शाळेला मिळाले संगणक

0
20

सांगली,दि.30ः युथ फॉर जत व व्हेरिटास टेकनॉलॉजीस पुणे कडून पांडोझरी (ता.जत) येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी बाबरवस्ती शाळेला संगणक देण्यात आले.संगणक आमदार विक्रम सावंत यांच्या हस्ते मुख्याध्यापक दिलीप वाघमारे यांना देण्यात आले.

पूर्व भागातील बाबरवस्ती प्राथमिक मराठी शाळा आय एस ओ मानांकन प्राप्त आहे.द्विशिक्षकी शाळा आहे.
युथ फॉर जत प्रयत्नातून पुणे येथील व्हेरिटास टेकनॉलॉजीस कंपनीच्या सीएसआर फंड मधून बाबरवस्ती शाळेस दोन संगणक देण्यात आले.यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण तसेच  संगणकाचे ज्ञान व कौशल्य आत्मसात करणे शक्य होणार आहे. मागील वर्षांपासून शाळेत संगणक उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न केेला होता.
दुष्काळी ग्रामीण भागातील शाळेला लंडन येथील अजय पवार ,पुणे येथील प्रदिप साळूंखे, शाळेतील शिक्षक दिलीप वाघमारे विशेष प्रयत्न यांनी करुन शाळेला दोन संगणक मिळवून दिले. यावेळी डॉ नानासाहेब थोरात,ऑक्सफर्ड यूनिवर्सिटी लंडनचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ मदन बोर्गीकर,डॉ कैलास सनमडीकर ,डॉ मोदी,अमित बामणे , सचिन जाधव, उपस्थित होते.

फोटो ओळ : जत येथील युथ फार कडून पांडोझरी (ता.जत) येथील जिल्हा परिषद बाबरवस्ती शाळेला संगणक आमदार विक्रम सावंत व डॉक्टर नानासाहेब थोरात,ऑक्सफर्ड यूनिवर्सिटी लंडनचे वरिष्ठ शास्त्रज्ञ यांच्या हस्ते दोन संगणक देण्यात आले. यावेळी डॉक्टर नानासाहेब थोरात, ऑक्सफर्ड यूनिवर्सिटी लंडनचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर. मदन बोर्गीकर, डॉ कैलास सनमडीकर,डॉक्टर मोदी उपस्थित होते.