ओबीसींचे देशातील नेतृत्व छगन भुजबळांनी करावे, आम्ही त्यांच्यासोबत-माजी खासदार शरद यादव

0
30
ओबीसी आरक्षणासाठी शरद यादव यांचे मोलाचे योगदान, आपल्या संघर्षमय जीवनात ओबीसींसाठी रचनात्मक कार्य*
*ओबीसी आरक्षणासाठी आता सर्वांनी एकत्र येण्याची गरज*
*मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते शरद यादव यांचा सत्कार*
*नवी दिल्ली, दि.30ऑगस्टः- आपल्या संघर्षमय जीवनात शरद यादव यांनी ओबीसी समाजासाठी रचनात्मक कार्य केले आहे. ओबीसी समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मोलाचे योगदान मंडल चळवळीचे योध्या राहिलेले माजी खासदार शरद यादव यांनी दिल्याचे प्रतिपादन महाराष्ट्राचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांनी केले. दिल्लीतील कॉन्स्टिट्युशनल क्लबमध्ये झालेल्या ओबीसी महासभेच्यावतीने आयोजित मंडल जंयती कार्यक्रमात ना. भुजबळ बोलत होते.
ओबीसी समाजाला आरक्षण मिळावे यासाठी शरद यादव यांनी केलेल्या कार्याचा गौरव करण्यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासभेने दिल्लीत कार्यक्रम आयोजित करून महाराष्ट्राचे मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते शरद यादव यांचा सत्कार केला.कार्यक्रमाचे अध्यक्ष तामिळनाडूचे राज्यसभा एड.खासदार पी.विल्सन होते.
माजी खासदार शरद यादव यांनी ओबीसी वर्गाला आरक्षण मिळावे यासाठी केलेली मोर्चेबांधणी आजही आम्हाला माहीत आहे. शरद यादव यांनी अगदी न्यायालयीन लढाई पासून आंदोलन करण्यापर्यंत महत्वाची भूमिका निभावल्याची आठवण छगन भुजबळ यांनी करून दिली. मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करताना झालेल्या विविध गोष्टींवर देखील छगन भुजबळ यांनी सविस्तर भाष्य केले.
यावेळी बोलतांना आपल्या भाषणात माजी खासदार शरद यादव म्हणाले की ओबीसी समाजाला आरक्षण मिळवून देताना आम्ही मोठा संघर्ष केला, यात शंका नाही. पण आता ओबीसी आरक्षणावर निर्माण झालेल्या प्रश्नांवर देखील मोठा लढा दिला पाहिजे. आणि या देशव्यापी आंदोलनाचे नेतृत्व छगन भुजबळ यांनी करावे. छगन भुजबळ यांनी देखील ओबीसी आरक्षणासाठी संघर्ष केला आहे,त्यामुळे आता देशव्यापी लढा त्यांनी उभारावा आम्ही त्यांच्या सोबत असल्याचे विचार व्यक्त केले.कार्यक्रमाला युवा नेते हार्दिक पटेल,माजी खासदार राजकुमार सैनी,खासदार गणेश सिंह,माजी विधानसभा अध्यक्ष उदय नारायण चौधरी,अंतरराष्ट्रीय संत्यशोधक समाजाचे मुख्य संयोजक सुनिल सरदार,माजी खासदार बी.के.हरीप्रसादर,माजी मंत्री कमलेश्वर पटेल,आमदार बिहार सतिशकुमार,वरिष्ठ समाजसेवक फुलसिंह बघेल,राजवीरसिंह बघेल,ओबीसी महासभेचे विजयकुमार,धर्मेंद्र कुशवाह यांच्यासह ओबीसी महासभेचे पदाधिकारी उपस्थित होते.देशभरातील ओबीसी विचारवंत व कार्यकर्त्यांनीही उपस्थिती लावली होती.