हिशेब मागाल, तर आत्महत्या करेन !

0
7

फुलचुरच्या ग्रामविकास अधिकाèयाची धमकी : अफरातफर केल्याचा आरोप
गोंदिया,दि.१३ : फुलचूर ग्रामपंचायतीच्या कारभारात गौडबंगाल सुरू आहे. खोडतोड करून कर बुडविण्याचा प्रकार ग्रामविकास अधिकारी करत आहेत. त्यांना हिशेबाविषयी माहिती मागितली असता ‘हिशेब मागाल, तर आत्महत्या करेनङ्क ! अशी धमकी दिल्याचा आरोप उपसरपंच उमेश छगन पंजारे यांनी केला.
पत्रकारांना माहिती देताना ते बोलत होते. ग्रामविकास अधिकारी टी. डी. बिसेन यांच्या कडून शासन नियमांच्या होत असलेल्या पायमल्ली संदर्भात त्यांनी यावेळी पाढा वाचला. पंजारे पुढे म्हणाले, कर मागणीच्या पावत्यांमध्ये तारखेत फेरबदल करून पैशांचा वापर स्वतःकरिता केला. ग्रामपंचायतींतर्गत येणाèया सुमारे ४० एकर जमिनीची रजीस्ट्री झाली नसताना देखील त्यांना बांधकामाचे ना हरकत प्रमाणपत्र दिले. परिशिष्ट ब च्या कागदपत्रांमध्ये फेरबदल करणे, लाखो रुपयांचे कर नियमाप्रमाणे गोळा न करता स्वतःच्या मर्जीने जमा करणे, भूखंडांचे नकाशे नसताना देखील त्या भूखंडांची ग्राम पंचायतीत नोंद करणे, ग्राम पंचायतीच्या राजस्वाचे नुकसान करणे, जावक रजिस्टरमध्ये नोंद न करता नमुना आठ देणे आणि बांधकामाचे प्रमाणपत्र देणे आदी गंभीर बाबी उघडकीस आल्या. पदाधिकारी असल्याने माहिती मागविल्यास ग्राम पंचायतीने ती उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. परंतु, ग्रामविकास अधिकारी बिसेन माहिती देण्यास टाळाटाळ करतात. हिशेब मागाल तर आत्महत्या करण्याची धमकी देखील देत असल्याचे पंजारे यांनी सांगितले. यासंदर्भात आपण पंचायत समिती सभापती, गटविकास अधिकारी, उप मुख्यकार्यकारी अधिकारी(पंचायत), पालकमंत्री राजकुमार बडोले, पोलीस निरीक्षक आदींना पत्रव्यवहार केला असल्याची माहिती उमेश पंजारे यांनी दिली. यावेळी माजी उपसरपंच अशोक चन्ने, तंटामुक्त समिती अध्यक्ष शिवनारायण नागपूरे, माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष सेवकराम बनसोड,सुनील नागपुरे, मीलन रामटेककर आदी उपस्थित होते.