शिक्षण प्रक्रियेत आमूलाग्र बदल अपेक्षित- नाना पटोले

0
14

साकोली : आजच्या काळात केवळ एका महाविद्यालयात शिक्षणाशिवाय पर्याय नव्हता पण आजच्या विद्यार्थ्यांना खूप काही करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. भविष्यकाळाचा वेध घेता शिक्षण प्रक्रियेमध्ये आमुलाग्र बदल होणार आहे, असे प्रतिपादन खासदार नाना पटोले यांनी केले. कटकवार विद्यालयात वार्षिकोत्सवाच्या उद््घाटन प्रसंगी ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी विद्या कटकवार तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. संजय पोहरकर, अंजनाबाई खुणे, मनोहर राखडे, पी.डी. मुंगमोडे, भैय्यालाल तांडे, उपस्थित होते. तत्पूर्वी ग्लोबल नेचर क्लब, प्राचार्य मस्के, स्नेहसंमेलन प्रमुख यु.टी. गायधने, विज्ञान व क्रीडा प्रदशनीचे उद््घाटन अतिथींचे परिचय व स्वागत करून स्व. कटकवार स्मृती पारितोषिक, सेवानवृत्त प्रा. महेश उजवणे पारितोषिक तसेच राज्य, राष्ट्रीय खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.
खा. पटोले म्हणाले, अतिशय कठीण परिस्थितीत माजी आमदार जयंत कटकवार यांनी शाळेची सुरूवात केली. आज या विद्यालयात कला, विज्ञान व माध्यमिक शाळतून शेकडो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. निकाल १00 टक्के विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास खेळांच्या माध्यमातून राज्य, राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेत आहेत. साकोली माझी कर्मभूमी आहे व त्यासाठी या भागातील गरीब, शेतकरी कुटूंबातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या सोयी उपलब्ध करून देण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. बुद्धीचा वापर आपण कसा करतो हे आपल्यावर अवलंबून आहे. संचालन शिवदास लांजेवार यांनी तर आभार बाळकृष्ण लंजे यांनी मानले