सागर आरेकर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष

0
27

अर्जुनी मोरगाव,दि.12ः- येथील नगरसेवक सागर आरेकर यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या शहर अध्यक्ष पदावर निवड करण्यात आली.राज्यसभा सदस्य प्रफुल्ल पटेल,माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष केतन तुरकर यांनी आरेकर यांची शहर अध्यक्ष पदावर नियुक्ती केली.गोंदिया येथे पालकमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या स्वागत समारंभात माजी खासदार खुशाल बोपचे,आमदार मनोहर चंद्रिकापूरे यांच्या उपस्थित त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.
नुकत्याच पार पडलेल्या नगरपंचायत निवडणुकीत आरेकर यांनी भाजपच्या बलाढ्य उमेदवाराला धूळ चारली.यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठांनी दखल घेत पक्ष संघटना मजबूत करण्याच्या उद्देशाने आरेकर यांच्यावर ही जबाबदारी देण्यात आली.निवडीचे श्रेय राष्ट्रवादी गोंदिया जिल्हा अध्यक्ष गंगाधर परशुरामकर,आमदार मनोहर चंद्रिकापुरे,प्रा.यशवंत परशुरामकर,लोकपाल गहाणे,योगेश नाकाडे आणि कार्यकर्त्यांना दिले आहे.