कुलगुरूसोबत विद्यार्थ्यांचा संवाद

0
23

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाच्या संदर्भात विद्यार्थ्यांच्या समस्या, प्रश्न जाणून घेण्यासाठी व त्या तातडीने सोडविण्यासाठी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर हे मंगळवार दि.१९ एप्रिल २०२२ रोजी महात्मा फुले भवन, परीक्षा विभाग, विद्यानगरी, सांताक्रूझ पूर्व मुंबई येथे सकाळी १०.३० ते दुपारी १२.३० या वेळेत विद्यार्थ्यांशी भेटून संवाद साधणार आहेत.

विद्यार्थ्यांनी आपल्या प्रश्नाशी संबधित असलेली सर्व कागदपत्रे सोबत आणावीत. या विद्यार्थ्यांबरोबर कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर संवाद साधतील तसेच विद्यार्थ्यांचे प्रश्न किंवा समस्या यांची सोडवणूक या संवाद सत्रात होईल. विद्यार्थ्यांच्या समस्या तातडीने सोडविण्यासाठी कुलगुरू सोबत परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील व परीक्षा विभागाचे उपकुलसचिव देखील उपस्थित राहणार आहेत. याद्वारे विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्यात येणार आहेत. हा उपक्रम दर मंगळवारी सकाळी १०.३० ते दुपारी १२.३० या वेळेत होणार आहे. परीक्षा विभागाशी संबंधित  विद्यार्थ्यांचे प्रश्न व समस्या तातडीने सोडवण्यासाठी विद्यापीठाने हा उपक्रम सुरू केला आहे.