आदिवासी उमावि खजरी शाळेचा यश कोंटांगले तालुका विज्ञान प्रदर्शनात चमकला

0
15

स/अर्जुनी,25ऑगस्ट- विद्यार्थी जिवनापासूनच वैज्ञानिक दृष्टिकोन रूजावा या संकल्पनेतून दर वर्षी शिक्षण खात्याच्या वतिने तालुका,जिल्हा,विभागस्तरीय व राज्य स्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात येते.या अनुसंगाने शिक्षण विभाग प.स.स/अर्जुनीच्या वतिने ता.24 ऑगस्ट रोजी जि.प.उमावि स/अर्जूनी येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते.
यात तालुक्यातील निवडक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांनी सहभाग घेतला होता.आदिवासी विकास हायस्कूल व कला,विज्ञान उमावि खजरी/डोंगरगाव येथील विद्यार्थ्यांनी इ.6 ते इ.8 वी गटातून व इ.9 ते इ.12 वी गटातून प्रत्येकी एक प्रतिकृती सादर केली होती.
परीक्षणाच्या अंती इ.9 ते इ.12 वी च्या गटातून आदिवासी विकास हायस्कूल व कला,विज्ञान उच्च माध्यमिक विद्यालय खजरी येथील यश दिपक कोंटागले व आझाद हिरालाल उंदिरवाडे यांनी सादर केलेला To Produce Electricity from the solar Panels या विषयावरील प्रयोग स/अर्जुनी तालुक्यातील शाळा मधून गुणानुक्रमे प्रथम आलेला आहे.
विज्ञान प्रदर्शनीचे परीक्षक विषय साधन व्यक्ती टी.एम.राऊत,एस.बी.राऊत, अनिल वैद्य होते.ता.24 ऑगस्ट रोजी आयोजित पारितोषिक समारंभाच्या अध्यक्षस्थानी जि.प.उमावि स/अर्जुनी चे प्राचार्य ए.पी.मेश्राम होते.या प्रसंगी विचार मंचकावर से.निवृत्त शिक्षक आर.व्हि. मेश्राम, आयोजक विज्ञान शिक्षक डी.पी.डोंगरवार, जी.बी.डोंगरवार, डब्लु. एम.परशुरामकर व परीक्षक उपस्थित होते.
यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थाध्यक्ष जे.एस.रहांगडाले,संस्था सचिव एन.एन.येळे, गटशिक्षणाधिकारी सुभाष बागडे,प्राचार्य खुशाल कटरे,पर्यवेक्षक रविशंकर कटरे,विज्ञान शिक्षक प्रा.पी.आर.उके,प्रा.श्रध्दा तिरपूडे, प्रा.नितिन पुस्तोडे,एच.आय.चौधरी यांनी केले.