दारूची पार्टी पडली महागात : सहायक अभियंता जांभुळे निलंबित

0
115

 गडचिरोली-धानोरा येथील जिल्हा परिषद बांधकाम उपविभागात कार्यरत असलेले सहायक अभियंता (श्रेणी-२) के. एच. जांभूळू यांनी केलेल्या दारूच्या पार्टीचे व्हिडिओ व सीडी तयार करून त्यांची तक्रार मुख्य कार्यपालन अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली यांच्याकडे करण्यात आली होती. मुख्याधिकारी या प्रकरणाची चौकशी करून सहायक अभियंता जांभूळे हे दोषी आढळून आल्याने त्यांच्यावर १२ ऑगस्ट रोजी निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे. या कारवाईमुळे धानोरा तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
याबाबत राजेश नाथांनी यांनी भारतीय माहिती अधिकार जिल्हा सहाय्यक संपादक तथा इतर सात कंत्राटदारांनी २४ जून २0२२ ला मुख्य कार्यकारी अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती. तक्रारीत म्हटले होते की, सहायक अभियंता के. एच. जांभुळे यांना धानोरा तालुका अंतर्गत ग्रामपंचायत दुगार्पुर अंतर्गत पळसगाव येथे सिमेंट काँक्रेट रोडचे बांधकाम बांधकामावर रोब दाखवीत दारू पाजण्यास संबंधित मागणी करण्यात आली. सोबत पार्टीचे आयोजन करण्याची मागणी करून ती दिल्याशिवाय एम २0 चे कॉंक्रिट करू देणार नाही, अशी धमकी देखील सहाय्यक अभियंत्या दिली. तसेच आपल्याला दुसरे लग्न करायचे आहे, त्यामुळे एखादी मुलगी पाहून द्यावी, अशी मागणी देखील केली होती. या सर्व पाटीर्चे व्हिडिओ तयार करण्यात आले होते. सदर व्हिडीओ मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे देण्यात आली होती. संबंधित अभियंता कामाचे बिल काढण्याकरिता ५ टक्के ची मागणी देखील करतो, अशी देखील पदरात तक्रार करण्यात आली होती. त्या अनुषंगाने मुख्य कार्यकारण अधिकारी यांनी संबंधित प्रकरणाची चौकशीसाठी समिती नेमून चौकशी केली असता, असे निर्देशनात आले की, सहाय्यक अभियंता (श्रेणी-२) के.एच. जांभुळे यांनी सादर केलेल्या खुल्याशाचे अवलोकन केले असता गैरवर्तन न केल्याचा कुठलाही पुरावा सादर केलेला नाही. त्यामुळे त्यांच्या प्राप्त खुलासा असमाधानकारक असून त्यांना आपले नियत कर्तव्य कसूर करून महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा वर्तणूक नियम १९६७ मधील नियम ३ चा भंग केल्याचे स्पष्ट होते. तेव्हा जि.प. बांधकाम उपविभागाचे धानोराचे सहायक अभियंता(श्रेणी-२) के. एच. जांभुळे यांना महाराष्ट्र जिल्हा परिषदा जिल्हा सेवा शिस्त व अपील नियम १९६४ मधील नियम ३ (१) नुसार सेवेतून निलंबित करण्यात आले.
सहायक अभियंता के.एच. जांभुळे हे सध्या कार्यरत जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग धानोरा यांचे निलंबन कालावधी मुख्यालय जिप बांधकाम विभाग मनपा उपविभाग पंचायत समिती येथे ठेवण्यात येत असून त्यांना कार्यालय प्रमुखाचे पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही. सहाय्यक अभियंता जांभुळे यांना महाराष्ट्र नागरिक सेवा (निलंबन बडतर्फी व सेवेतून काढून टाकणे यांच्या काळातील प्रदाने) नियम १९८१ चे नियम ६८ मधील तरतुदीनुसार निर्वाह भत्ता अनु™ोय राहील. सदर भत्ता त्यांच्या अर्धपगारी रजेबरोबर राहील व त्यावर अनु™ोय असलेला महागाई भत्ता अनु™ोय राहील. निलंबन कालावधीत त्यांना महाराष्ट्र नागरिक सेवा नियम १९८१ चे नियम ६९ च्या पोटनिम प्रमाणे कोणतेही नोकरीत आता धंदा करता येणार नाही, असे केल्यास शिक्षेस पात्र राहील, असा आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली कुमार आशिर्वाद यांनी काढलेला आहे.