मॉडेल कॉन्व्हेंट एण्ड सायन्स ज्यू. कॉलेज गोरेगांव मध्ये बिरसा मुंडा जयंती उत्साहात

0
13

गोरेगाव:- स्थानीय मॉडेल कॉन्व्हेंट एण्ड सायन्स ज्यू. कॉलेज गोरेगांव मध्ये 15 नोव्हेंबर ला जननायक बिरसा मुंडा यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला शाळेचे प्रशासकीय अधिकारी सी. बी. पटले , शाळेच्या प्राचार्या सौ. सी. पी. मेश्राम, शाळेचे सर्व शिक्षक वृंद तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी व शाळेतील सर्व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आले. कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थ्यांनी भाषणे सादर केले. तसेच सहा. शि. आर. एम. कटरे  यांनी बिरसा मुंडा यांच्या जिवनावर प्रकाश ताकत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सर्व विद्यार्थी व शिक्षकवृंद यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे संचालन वर्ग
10 वी ची विद्यार्थिनी कु. वैशाली जगदीश बोपचे, तर आभार कु. प्रेरणा परमानंद रहांगडाले हिने मानले.