सरस्वती ज्ञानदीप कॉन्व्हेंट आणि जी एम बी हायस्कूल येथे बालक दिन उत्साहात साजरा

0
9

 अर्जुनी / मोर- स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान व बालकांचे लाडके नेते पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती बालक दिन म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली.
सर्वप्रथम कार्यक्रमाच्या अध्यक्षा शाळेच्या प्राचार्या शव्या जैन तथा पर्यवेक्षक मुकेश शेंडे यांच्या हस्ते माता सरस्वती व पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमांचे पूजन करून पुष्पमाला अर्पण करण्यात आले.
बालकांच्या विकास हाच देशाचा विकास असतो असे प्रतिपादन शाळेच्या प्राचार्या शव्या जैन यांनी केले. बालकांच्या बौद्धिक व मानसिक विकासाबरोबरच शारीरिक विकासही व्हावा या उद्देशाने बालक दिनाचे औचित्य साधून विविध खेळांचे आयोजन करण्यात आले त्यामध्ये वर्गानुसार विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या खेळांचे आयोजन करण्यात आले त्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी हिरीहिरीने भाग घेतला.
वर्ग 1 ते 4 करिता वनभोजन कार्यक्रम नवेगाव बांध येथे आयोजित करण्यात आलेला होता. त्याचप्रमाणे वर्ग 5 ते 10 करिता विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार ज्ञानेश्वर रोकडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सांस्कृतिक प्रमूख श्रद्धा कापगते तसेच प्रसन्न भांडारकर, रजनी गुलें, भारती परिहार, स्नेहा चव्हाण, पल्लवी वाघ, दुष्यंत बंसोड ईश्वर बोरकर, डोंगरे सर लुटे सर परिचर लांजेवार, नंदनवार, वलथरे, बरगे, आदींचे सहकार्य लाभले .