शिक्षण संस्थेतील शाळेमधील शिक्षकांची बिंदू नामावली अद्यावत करा

0
22
 *कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे शिक्षणाधिकारी (माध्य.) यांना विविध मागण्यांचे निवेदन*
गोंदिया- मागासवर्गीय शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या  प्रलंबित समस्या निकाली काढण्यासाठी दि. ५ डिसेंबर  ला ओमप्रकाश वासनिक अति.राज्य सरचिटणीस कास्ट्राईब शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य तथा जिल्हाध्यक्ष  कास्ट्राईब कर्मचारी महासंघ  जिल्हा गोंदिया  यांच्या नेतृत्वात  कादर शेख शिक्षणाधिकारी (माध्य.) यांचेकडे नियोजित बैठक संपन्न झाली. यावेळी नरेंद्र भगत अधीक्षक उपस्थित होते. यावेळी निवेदनातील  सर्व विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात करण्यात आली. सर्व समस्या निकाली काढण्याचे आश्वासन शेख यांनी दिले.
शिक्षण संस्थेतील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची बिंदू नामावली अद्यावत करण्यात यावी, मागासवर्गीय शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा अनुशेष वेळीच भरून काढण्यात यावा, मागासवर्गीय शिक्षकांच्या जागा शिक्षक संस्थेत भरण्यात याव्या, नियमानुसार मुख्याध्यापक पदावर पदोन्नती देण्यात यावी, खाजगी शिक्षण संस्थेमध्ये अतिरिक्त शिक्षक ठरविताना शासन आदशाचे पालन करण्यात यावे, दिनांक २/४/१९५३ च्या शासन निर्णयाप्रमाणे मागासवर्गीय शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना अतिरिक्त ठरविण्यात येऊ नये, सर्व प्रशिक्षित पदवीधर शिक्षकांना माध्यमिक शिक्षकांची वेतन श्रेणी लावण्यात यावी,सर्व शाळांचे दर महिन्याचे वेतन १ तारखेला करण्यात यावे, मृत/दिव्यांग खाजगी शाळेतील माध्य. शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती देण्यात यावी, विद्यार्थ्यांना नियमित शिष्यवृत्ती देण्यासंदर्भात कार्यवाही करण्यात यावी, सर्व माध्यमिक शाळांमध्ये वाचनालय खोली उपलब्ध असावी, सर्व शाळांमध्ये शालेय परिपाठात संविधान प्रास्ताविक व भारतीय संविधानाचे कलमांचे वाचन  करण्यात यावे, सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्तीची फाईल ६ महिन्यापूर्वी मंजूर करण्या संदर्भाने कार्यवाही करण्यात यावी, माध्यमिक शाळेतील सेवानिवृत्त शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना उपदान, अंशराशिकरण, रजा रोखिकरण, भविष्य निर्वाह निधी, सर्व लाभ देण्यात यावे, चर्चेची कार्योत्तर प्रत संघटनेस देण्यात यावी अशा विविध मागण्यांचा समावेश होता.
    शिष्टमंडळात  कास्ट्राईब शिक्षक संघटना म. राज्य चे अति सरचिटणीस तथा  कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष ओमप्रकाश वासनिक, कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय उके, भरत वाघमारे, विरेंद्र भोवते, किशोर डोंगरवार, सौ. उमा गजभिये, राजेंद्र सांगोळे, अमित गडपायले, अनिल मेश्राम, सोनटक्के व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.