30.5 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home विदर्भ जि.प.उपाध्यक्ष इंजि.यशवंत गणविर ग्लोबल बुद्दिस्ट पुरस्काराने सन्मानित

जि.प.उपाध्यक्ष इंजि.यशवंत गणविर ग्लोबल बुद्दिस्ट पुरस्काराने सन्मानित

0
41

blank

गोंदिया,दि.06- गोंदिया जि.प.उपाध्यक्ष तथा सभापती शिक्षण क्रीडा व आरोग्य इंजि.यशवंत गणविर ग्लोबल बुद्दिस्ट अम्बेसिडर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.बुद्दिस्ट रिसर्च सेंटर व्हिएतनाम ,त्रिरत्न भुमी फाऊंडेशन व गगन मलिक फाऊंडेशन इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई येथे सुर्यवंशी क्षत्रिय सभागृह दादर हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. तळागाळातील सर्व सामान्य माणूस अशी प्रतिमा असलेले इंजि.यशवंत गणविर यांना हा पुरस्कार मिळाला असून जिल्ह्यातील जनतेच्या गौरवाची बाब आहे.एक सामान्य कार्यकर्ता ते जि.प.उपाध्यक्ष असा प्रवास करणारे एक अन्यन साधारण व्यक्तीमत्व म्हणून यशवंत गणविर यांना ओळखले जात असून अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गोठणगाव जिल्हा परिषद क्षेत्राचे ते लोकप्रतिनिधी आहेत. त्यांना मिळालेल्या पुरस्काराकरीता सर्वत्र त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

blank