शोषीतांचे, महिलांचे मुक्तीदाते डॉ. बाबासाहेब आंबेडकर : तेजराव वानखेडे

0
7

रिपाइं आठवले पक्षातर्फे महामानवास विनम्र अभिवादन

वाशिम : रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडियाच्यावतीने महामानव, विश्‍वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना 66 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष रिपाइं आठवले जिल्हाध्यक्ष तेजराव वानखेडे होते. प्रमुख उपस्थितीमध्ये जेष्ठ साहित्यीक कवी महेंद्र ताजणे, जेष्ठ साहित्यीक शेषराव पिराजी धांडे, फेडरेशनचे अध्यक्ष सहदेव चंद्रशेखर, रिपाइं तालुकाध्यक्ष प्रकाश गवई, पंचशिल विद्यालंकार संस्थेचे अध्यक्ष सत्यानंद कांबळे, अरविंद उचित यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी बोलताना तेजराव वानखेडे म्हणाले की, हा देश एकसंघ राहुन शांती, समता, बंधुभाव व न्यायाचे अविरत सुराज्य नांदायचे असेल तर येथील शासनकर्त्यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाचे काटेकोरपणे पालन करुन शोषीत वंचीत समाजाला शिक्षीत केले पाहिजे. समाजातील प्रत्येक शोषीत वंचीत व्यक्तीला संधी देवून त्यांचा यथोचीत सन्मानाची हमी घेवून त्यांचा सहभाग राष्ट्राला समृध्दमय, आनंदमय करण्यात प्रत्येक व्यक्तीच्या बुध्दीचा उपयोग व्हावा, त्यांना तशी संधी मिळावी, या पृथ्वीवर शांती, समता, करुणेचे राज्य रहावे, यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अहोरत संघर्षरत कार्य केले. त्यांचा त्याग हा जगाला उर्जा निर्माण करणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले आपल्या रक्ताचा थेंब असेपर्यंत स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी आपण निर्धार केला पाहिजे. आपल्याला राजकीय स्वातंत्र्य मिळाले. परंतू सामाजीक व आर्थिक स्वातंत्र्याच्या आपण फार दुर आहोत. येथील राज्यकर्त्यांनी, सामाजीक, आर्थिक समानता आणण्यासाठी प्राणपणाने झटले पाहजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शोषीतांना न्याय देण्यासाठी अहोरात्र संघर्ष केला. म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे शोषीत, वंचीताचे महिलांचे मुक्तीदाते आहेत असे तेजराव वानखेडे याप्रसंगी म्हणाले.
याप्रसंगी जेष्ठ कवी साहित्यीक महेंद्र ताजणे, जेष्ठ कवी साहित्यीक शेषराव धांडे यांनी विचार व्यक्त केले. कार्यक्रमाला माजी सैनिक सिध्दार्थ भगत, उद्योजक सुनिल तायडे, सौ. श्रध्दा सुनिल तायडे, प्रा. दशरथ खडसे, दिपस्तंभ आर्केष्टा निर्मात्या सौ. रेखा खडसे, जेष्ठ कवी विलास भालेराव, सुखदेव मैंदकर, प्रविण पट्टेबहादुर, धनंजय कांबळे, सिध्दार्थ पाटील, कैलास तेलगोटे, बेलखेडे, प्रा. सरकटे, राहुल मैंदकर, उल्हास इंगोले, बिट्टू खडसे, निलेश कंकाळ, सरपंच अशोक कांबळे, हिरामण साबळे, सत्यवादी खडसे, महेंद्र जाधव यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन अभिनेते तथा रिपाइं प्रवक्ते अरविंद उचित यांनी केले.