जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन आजपासून

0
6

गोंदिया. जिल्हा परिषद शिक्षण विभाग आणि शहिद जान्या तिम्या जिल्हा परिषद माध्यमिक विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय 21 व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन ता. 7) पासून करण्यात आले आहे. गोरेगाव येथील शहीद जान्या तिम्या विद्यालयात पार पडणाऱ्या प्रदर्शनाचे उद्घाटन सकाळी 10.30 वाजता जि.प. अध्यक्ष पंकज रहांगडाले यांच्या हस्ते सीईओ अनील पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे. यावेळी उपाध्यक्ष यशवंत गणवीर, सभापती सविता पुराम, संजय टेंभरे, पूजा सेठ, रुपेश कुथे, राजकुमार यादव, सभापती मनोज बोपचे उपस्थित राहतील. 8 फेब्रवारीला विद्यार्थी, शिक्षक व पालकांकरिता प्रदर्शनाचे अवलोकन, पारितोषीक वितरण व समारोप होणार आहे.