LFW राज्यस्तरीय उपक्रम:नवेगाव/धापे. शाळेचे, तिसऱ्या वर्गाचे दोन विद्यार्थी, राज्यस्तरावर टॉपटेनमध्ये

0
14

गोंदिया,दि.12ः- “तिसऱ्या वर्गाचे विद्यार्थी सहजरीत्या वाचू, लिहू शकतात मोठे इंग्रजी शब्द.., स्वतः मोबाईलवर लिंक ओपन करून वर्षभर सोडवीत असतात ऑनलाईन टेस्ट..!!”जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा नवेगाव/धापे. येथील उपक्रमी शिक्षक सी. एच. बिसेन, हे गुणवत्ता वाढीस्तव, सातत्याने दरवर्षी विविध उपक्रम शाळेत/वर्गात राबवित असतात.lfw (leaf for word) संस्था मुंबई संचालित, इंग्रजीच्या भरीव गुणवत्ता वाढीस्तव, इयत्ता 3 री करिता हा उपक्रम, चालू शैक्षणिक सत्रात, अथक प्रयत्नांतून यशस्वीरीत्या राबविला.
Lfw संस्थेकडून सहज सोप्या क्लृप्त्यायुक्त मार्गदर्शनात्मक व्हिडिओ, सरावातमक पीडीएफ, इतर सूचना व सरावांती सोडविण्यासाठी weekli quiz, असे ई लर्निग साहित्य व्हॉट्सअपवर ग्रुपवार येत असतात. रजिस्टर केलेल्या विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांकडून वेळच्या वेळी सराव करून घ्यायचा असतो.सरावांती quiz link आली की, ऑनलाईन quiz उत्सुकतेने सोडावीत असतात.त्यानंतर WPC quizzes स्पर्धा सुरू होतात. WPC practice quizzes ह्या राज्यस्तरीय स्पर्धेत आयुष सोनेलाल टिकापाच व भावेशपुरी दिपकपुरी मुलतानी या विद्यार्थ्यांनी उत्तम गुण मिळवून, राज्यस्तरावर टॉप टेन मध्ये आपले स्थान निश्चित करून उंच भरारी घेतली आहे.
त्याबद्दल lfw संस्था मुंबई तर्फे त्यांचे गौरवात्मक अभिनंदन करण्यात आले आहे. हे विद्यार्थी बक्षीस पात्र आहेत.
Lfw उपक्रमात राज्यात टॉप टेन मध्ये आल्याबद्दल, मुख्याध्यापक आर. एस. चौधरी, सी. एच. बिसेन, कु. सी. डी. गजभिये, एम. एन. उके, ए. टी. सेंदुरकर, सौ. एल. आर. राऊत, आर. एच. राऊत, कु. तृप्ती ठाकरे, कवरे भाऊ, सौ. संध्याबाई कवरे यांनी यांनी गोड कौतुकासह पुष्पगुच्छ देवून विद्यार्थ्यांचे स्वागत केले. सर्वत्र विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.